घटस्फोटाच्या दोन वर्षात समांथा आणि नागा चैतन्यमध्ये झाला पॅचअप!
Samantha Ruth Prbhu : समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट होऊन दोन वर्षे झाले आहेत. त्यांच्या घटस्फोटानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. त्यात आता समांथानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या बदलामुळे त्यांच्यात पॅचअॅप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Samantha Ruth Prbhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही तिच्या कामापेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहते. समांथानं अभिनेता आणि पती नागा चैतन्यला दोन वर्षांपूर्वी घटस्फोट दिला. त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तर ते दोघे आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी नागा चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरु होती. तर दुसरीकडे आता समांथा आणि नागा चैतन्यमध्ये सगळ्या गोष्टी नीट झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याचं कारण समांथाचं सोशल मीडिया अकाऊंट आहे.
समांथानं नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांचे काही फोटो डिलीट केले असे अनेकांना वाटत होते. त्यात आता समांथाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नागा चैतन्यसोबतचे फोटो पुन्हा दिसत आहेत. याचा अर्थ समांथानं कधिच हे फोटो डिलीट केले नव्हते तर ते अर्काइव्ह केले होते. त्यामुळे ते आता दिसत आहेत. समांथानं 23 नोव्हेंबर 2017 मध्ये शेअर केलेला तिचा आणि नागा चैतन्यचा लग्नातील फोटो आता तिच्या इन्स्टाग्राम वॉलवर दिसत आहे. तिनं अनअर्काइव्ह केलेले हे फोटो आता चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोत समांथानं नागा चैतन्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
समांथानं फक्त तिच्या लग्नाचे फोटो नाही तर नागा चैतन्यसोबतचे इतर फोटो देखील अन-अर्काइव्ह केले आहेत. अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केलं. मात्र, त्यांचं लग्न हे फक्त 4 वर्ष टिकलं. त्यांचं खूप आलिशान लग्न झालं होतं. त्यांनी एक लग्न पारंपारिक पद्धतीनं केलं तर एक ख्रिश्चन पद्धतीनं केलं होतं. त्यामुळे त्या दोघांना यातून बाहेर पडण्यास खूप वेळ लागला.
हेही वाचा : लोकप्रिय अभिनेत्याच्या अल्पवयीन लेकीची आत्महत्या
समांथानं आता हे फोटो अनअर्काइव्ह केल्यानं त्या दोघांमध्ये सगळ्या गोष्टी नीट झाल्या आहेत. अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना आनंद झाला आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत की ते दोघे एकत्र येणार आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट करत म्हटलं की 'शोभिता पिक्चरमधून गेली का?' तर तिसरा नेटकरी म्हणाला की, 'हे फोटो अन-अर्काइव्ह करून ती दाखवते की तिनं मुव्ह ऑन केलं आहे.'