Sameer Wankhede: `माझ्या नवऱ्याला केवळ...`, शाहरूख खान खंडणी प्रकरणावर क्रांती रेडकरची पहिली प्रतिक्रिया!
Kranti Redkar On Sameer Wankhede: सीबीआयने (CBI) समीर वानखेडे यांच्याविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आलीये. त्यावर आता समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) पहिली सीबीआयच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Sameer Wankhede Bribe case : भारतीय महसूल सेवेतील आयआरएस (IRS) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. साक्षीदार के. पी गोसावी आणि समीर वानखेडे यांचा आर्यन खानच्या (Aryan Khan) कुटुंबीयांकडून 25 कोटी रुपये उकळण्याचा डाव होता, असा आरोप पंच प्रभाकर साईल याने केला होता. अशातच आता सीबीआयने (CBI) समीर वानखेडे यांच्याविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आलीये. त्यावर आता समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) पहिली सीबीआयच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाली क्रांती रेडकर?
प्रत्येकाला माहित आहे की त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. हे फक्त आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या कारवाईत पूर्ण सहकार्य करत आहोत. कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार आहोत, असं क्रांती रेडकर वानखेडेने (Kranti Redkar On Sameer Wankhede) एएनआयशी बोलताना म्हटलं आहे.
समीर वानखेडे म्हणतात...
मला देशभक्त म्हणून बक्षीस मिळत आहे, काल एकूण 18 सीबीआय अधिकाऱ्यांनी माझ्या निवासस्थानावर छापा टाकला आणि माझी पत्नी आणि मुले घरात असताना 12 तासांपेक्षा जास्त वेळ झडती घेतली. त्यांच्याकडे 23,000 रुपये आणि चार मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. मी सेवेत रुजू होण्यापूर्वी या मालमत्ता नोंदणीकृत केल्या होत्या, असं समीर वानखेडे (Sameer Wankhede On Aryan Khan bribery case) यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी ड्रग्जप्रकरणात केलेल्या एका कारवाईत अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह 20 जणांना अटक करण्यात आली होती. कोर्टात धाव घेतल्यानंतर पुराव्याअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता झाली होती. दोन वर्षानंतर आता पुन्हा हे प्रकरण समोर आलंय, ते सीबीआयच्या कारवाईमुळे.. आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यातील 8 कोटी समीर वानखेडे यांना देणार होतो, असं एनसीबीचे पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी सांगितलं होतं. त्यानंतर वानखेडे चर्चेच्या भोवऱ्यात सापडले आहेत.