Sania Mirza Shoaib Malik Divorce: घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना सानिया मिर्झा (Sania Mirza)  आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या नात्याबद्दल रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. 12 एप्रिल 2010 मध्ये विवाह बंधनात अडकल्यानंतर 12 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. (sania mirza shoaib malik divorce)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटस्फोटोच्या चर्चा रंगत असताना सानियाने केलेली पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सानियाने घटस्फोट किंवा शोएबसोबतच्या नात्याबद्दल काहीही सांगितलेले नाही, फक्त एक  फोटो पोस्ट केला आहे. (sania mirza divorce)


सानीयाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सानिया (sania mirza social media post) रस्त्याच्या मध्यभागी एकटी उभी आहे. सोनिया जॉगिंग किंला व्यायाम करुन घरी परतत असल्याचा हा फोटो असावा... अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये दोन झाडांचे इमोजी टाकलं आहे. (sania mirza shoaib malik news)



दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोन्ही स्पोर्ट्स आयकॉन्सने नात्याबद्दल काहीही सांगितले नसले तरी, सानियाच्या वडिलांनी (sania mirza father) फेसबुकवर पोस्ट केली. गोपनीयतेची विनंती करताना सानियाच्या वडिलांनी सर्वांना वर्ल्ड कप  लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं.


शोएब आणि सानियाच्या घटस्फोटाचं कारण
शोएब आणि सानियाच्या घटस्फोटामागे सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात आलेली तिसरी व्यक्ती कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे. पाकिस्तानमधील बहुचर्चित अभिनेत्री आणि मॉडेल आएशा उमर आणि शोएबमध्ये असणारी जवळीक खेळाडूच्या वैवाहिक नात्याला गालबोट लावून गेली आहे. 


गेल्या काही महिन्यांपासून सानिया आणि शोएबला बऱ्याच ठिकाणांवर एकत्र पाहिलं गेलंय. इतकंच नव्हे, तर त्यांनी एका मासिकासाठी केलेल्या बोल्ड फोटोशूटमधील काही Photo ही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.