शोएब मलिकला घटस्फोट दिल्यानंतर सानिया मिर्झा पुन्हा विवाहबंधनात अडकणार? पाकिस्तानी स्टारशी करणार लग्न?
Sania Mirza: सानिया मिर्झाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने पुन्हा एका पाकिस्तानीशी लग्न केल्याची चर्चा आहे.
Sania Mirza: पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शोएब मलिकसोबत सानिया मिर्झाने लग्न केल्यापासून ती सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. सुरुवातीला पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न केल्यामुळे तिच्यावर लोकांनी टीका देखील केली होती. त्यानंतर 13 वर्षांनी तिचा घटस्फोट झाला. तेव्हा दोन्ही देशातील लोकांनी तिच्याबद्दल सहानुभूती दाखवली होती. मात्र, अशातच आता सानिया मिर्झाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झाने दुसरे लग्न केले आहे.
20 जानेवारी रोजी शोएबने त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो शेअर सर्व चाहत्यांनी हादरवून टाकले होते. शोएब मलिकने प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. यासोबतच शोएब आणि सानियाचा घटस्फोटही पक्का झाला. सनाचे हे दुसरे लग्न आहे. याआधी सनाने पाकिस्तानी गायक उमैर जसवालसोबत लग्न केले होते.
सानिया मिर्झाने केले दुसरे लग्न?
शोएबपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानियाचे नाव वारंवार कोणाशी ना कोणाशी जोडले जात आहे. याआधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसोबतच्या तिच्या लग्नाचे खोटो फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता सोशल मीडियावर अशी अफवा पसरली आहे की, सानिया मिर्झाने पुन्हा एकदा पाकिस्तानीशी लग्न केले आहे.
सना जावेदचा पहिल्या नवऱ्याने म्हणजेच उमेर जसवालने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. तो फोटो त्याच्या लग्नाचा असल्याच दिसत आहे. चाहत्यांनी त्याच्या फोटोंवर अभिनंदन अशा कमेंट्स देखील केल्या आहेत. दरम्यान, काही चाहत्यांनी त्याच्या फोटोंवर त्याची वधू सानिया मिर्झा आहे का? असा सवाल केला आहे.
सानिया मिर्झाने सना जावेदच्या माजी पतीसोबत केले लग्न?
उमैर जसवालने त्याचा एकट्याचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये त्याची वधू कुठेच दिसत नाहीये. असा स्थितीत त्याने कोणाशी लग्न केले याबाबत चाहते प्रश्न विचारत आहेत. एकाने त्याच्या फोटोंवर कमेंट केली आहे की, त्याची वधू सानिया मिर्झा आहे. तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले आहे की, उमैर जसवालचे लग्नाबद्दल अभिनंदन. कृपया वधू सानिया मिर्झा असल्याची पुष्टी करा. यानंतर सानियाने उमैरशी लग्न केल्याच्या अफवा पसरल्या आहेत.
मात्र, आम्ही तुम्हाला सांगतो की, असे काहीही झालेले नाही. उमैरने फक्त शेरवानीमधला त्याचा फोटो शेअर केला आहे. पण त्याने आपल्या वधूचा चेहरा दाखवला नाही. त्याने सानिया मिर्झाशी लग्न केलेले नाही. उमैरने 2020 मध्ये पहिले लग्न सना जावेदशी केले पण तीन वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.