मुंबई : बॉलिवूड स्टार संजय दत्त अनेक दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून दूर आहे. संजय दत्त सध्या मुबईत आहे. तर त्याची पत्नी आणि दोन मुलं दुबईमध्ये आहे. जगात सर्वत्र कोरोना व्हायरसचं सावट आहे. अशा परिस्थितीत त्याचं कुटुंब दुबईत अडकलं आहे. त्यामुळे संजूबाबाला त्यांची काळजी वाटत आहे. गेल्या एक महिन्यापासून त्याची पत्नी मान्यता आणि मुलं दुबईत आहेत. लॉकडानपूर्वी ते दुबईत गेले होते. परंतु परिस्थिती पाहता त्यांना भारतात येता आलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीएनएला दिलेल्या मुलाखतीत संजय म्हणला की, लॉकडाऊनच्या काळात मी माझ्या मुलांसोबत फेसटाईम संवाद साधतो. मला त्यांची कायम चिंता वाटते. मी माझ्या आयुष्यातला फार मोठा काळ लॉकडाऊनमध्ये घालवला आहे. अशा वेळी आपल्याला आपल्या कुटुंबाची  किंमत कळते.' असं म्हणत त्याने कुटुंबाप्रती आपली चिंता व्यक्त केली. 


शिवाय या वेळीत्याने तंत्रज्ञानाचे देखील आभार मानले, 'मला माझ्या मुलांसोबत समोरा-समोर गप्पा मारता येतात. त्यामुळे ज्याने हे तंत्रज्ञान विकसीत केलं आहे त्याचे मी आभार मानतो.' असं देखील तो यावेळी म्हणला. 
 
कोरोनाचा फैलाव झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित केला होता. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यांनी लॉकडाऊचा कालावधी वाढवत तो ३ मे पर्यंत केला आहे.