Sanjay Dutt Birthday : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने 29 जुलै 2024 रोजी 65 वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसानिमित्त संजय दत्तला अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या सर्व सेलिब्रिटींमध्ये एका पोस्टने सध्या सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी अभिनेता संजय दत्तच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री सायरा बानू यांनी त्यांचे दिवंगत पती दिलीप कुमार यांच्यासोबतचा अभिनेता संजय दत्तचा एक जुना फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याचबरोबर सायरा बानो यांनी संजय दत्तसोबतच एक किस्साही शेअर केला आहे.


ज्येष्ठ अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत 


सायरा बानो म्हणाल्या की, संजय दत्त माझ्यासाठी नेहमीच एका कुटुंबासारखा राहिला आहे. माझं संपूर्ण कुटुंब अम्माजी ते आपाजी आणि सर आम्ही त्याला एका लहान मुलापासून स्टार बनताना पाहिलं आहे. मला अजूनही आठवतं की जेव्हा नर्गिस आप्पा आमच्या घरी फंक्शन्ससाठी यायचे आणि त्यावेळी तोही त्यांच्यासोबत यायचा. लहानपणी तो खूप गोंडस दिसायचा.



'मी शैला बानूशी लग्न करेन'


अभिनेत्री सायरा बानो यांनी पुढे म्हटलं आहे की, मी नर्गिसजी यांना भेटायचे, त्यानंतर संजूलाही भेटायचे. मग संजू माझ्याकडे पाहून गोड आवाजात म्हणायचा, 'मी शैला बानूशी लग्न करेन'. संजूला मी आणि शर्मिला टागोर खूप आवडायचो. त्याच्या प्रवासात आम्ही सामील होतो याचा आनंद आहे. संजय तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असं म्हणत सायरा बानो यांनी संजय दत्तला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.