`साहब बीवी और गैंगस्टर 3` चा ट्रेलर रिलीज...
संजय दत्त गँगस्टरच्या भूमिकेत
मुंबई : 'संजू' या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये अभिनेता रणबीर कपूरने भूमिका साकारली आहे. असं सगळं असताना आता संजय दत्त आपला स्वतःचा सिनेमा घेऊन सज्ज झाला आहे. संजय दत्तचा 'साहब बीवी और गँगस्टर 3' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात संजय दत्त नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे. या सिनेमात अभिनेत्री चित्रांगदा सिंह असणार आहे.
या सिनेमात भरपूर सस्पेंस आणि थ्रिल पाहायला मिळणार आहे. गेल्या दोन सिनेमांप्रमाणे या तिसऱ्या गोष्टीत रिवेंज ड्रामा बदलला आहे. पहिल्यांदाच संजय दत्त या सीरीजच्या सिनेमाचा भाग बनला आहे. पाहा या सिनेमाचा ट्रेलर. दिग्दर्शक तिगमांशू धूलियाच्या या सिनेमात राजघराण्यातील वावर पाहायला मिळणार आहे. क्राइम आणि पॉलिटिक्स सारख्या गोष्टी यामध्ये आहेत. सोहा अली खान, कबीर खान, दीपक तिजोरी आणि नफीसा अली सारखे कलाकार आहेत. हा सिनेमा 27 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.