मुंबई : 'संजू' या अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित सिनेमात रणबीर कपूर संजयच्या भूमिकेत दिसणार आहे. पण, संजय दत्त आणि रणबीर कपूर यांची मैत्री फार जुनी आहे. रणबीर कपूर लहाणपणापासून संजय दत्तला 'आयडॉल' मानत होता, हा खुलासा खुद्द रणबीरनंच केलाय. मात्र, यामुळे ऋषी कपूर मात्र चिडले होते. 


पहिल्यांदा संजयला पाहिलं तेव्हा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९३ साली ऋषी कपूर यांच्यासोबत 'साहिबां' चित्रपटाची शुटींग करत असताना रणबीरनं संजय दत्तला पहिल्यांदा काश्मीरमध्ये पाहिलं होतं. एक लांबलचक व्यक्ती... ज्याचे केस वाढलेले होते... कानात ईअररिंग्स होत्या... अशा व्यक्तीनं रणबीरचं लक्ष वेधून घेतलं... आणि तो संजय दत्तच्या प्रेमातच पडला. 


भावाचं प्रेम


रणबीर सांगतो, त्यावेळी माझी बहिण रिद्धिमा आपल्या कपाटात सलमान खानचे पोस्टर लावत होती आणि मी संजय सरांचे... संजय दत्त कपूर कुटुंबीयांच्या खुपच जवळचा होता... संजय आपल्याला लहान भाऊच समजत होता, असंही रणबीरनं म्हटलंय.  


संजयला भरला दम 


संजय आपल्याला रात्री उशिरा आपल्या फरारीमध्ये फिरायला घेऊन जात होता. एका वाढदिवसाला संजय दत्तनं आपल्याला हार्ले डेव्हिडसन बाईक गिफ्ट केली होती... तेव्हा वडील ऋषी कपूर चांगलेच भडकले होते... 'माझ्या मुलाला बिघडवणं बंद कर. त्याला तुझ्यासारखं बनवू नको' अशी तंबीच त्यांनी संजय दत्तला दिली होती.