मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, जे त्यांच्या कामामुळे कमी, तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता संजय दत्त. संजूबाबाच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्याच्या चाहत्यांनाचं नाही, तर प्रत्येकाला माहिती आहे. संजूबाबाची ड्रग्सची सवय, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि कारावास... या गोष्टींबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. संजय दत्तच्या अफेअर्सबद्दल सांगायचं झालं तर, त्याचं एक दोन नाही, तर चक्क 308 मुलींसोबत रिलेशन होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय गर्लफ्रेंडना भावुक करण्यासाठी नाटक करायचा आणि हे नाटक अभिनेत्याच्या आईच्या कबरीसंबंधित होतं. संजूबाबाच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. त्यामधील एक किस्सा सध्या तुफान व्हायरल होत आहे. 



संजूबाबा सध्या 'शमशेरा' (Shamshera) सिनेमामुळे चर्चेत आहे. फिल्ममेकर राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी संजूबाबाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा केला आहे. 


राजकुमार हिरानी यांनी सांगितले की, संजू अनेक मुलींना डेट करायचा आणि लगेचच गर्लफ्रेंडला कब्रस्तानमध्ये घेऊन जायचा, जिथे तो त्याच्या आईच्या 'बनावट' कबरीवर रडायचा. संजूबाबाच्या आयुष्यातील ही गोष्ट हिराना यांनी  इंडिया टुडेला सांगितली आहे.


हिरानी म्हणाले, 'संजू त्याच्या गर्लफ्रेंडला कब्रस्तानमध्ये घेऊन जायचा आणि मुलींना म्हणायचा, 'ही माझ्या आईची कबर आहे..' असं सांगितल्यानंतर मुली संजयसोबत भावनात्मक रित्या जोडल्या जायच्या. पण ती कबर त्याच्या आईची नव्हती...' सध्या संजय दत्तच्या आयुष्यातील किस्सा तुफान व्हायरल होत आहे. 


संजय दत्तच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरचं 'शमशेरा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात संजय विरोधी भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात अभिनेता रणबीर कपूर आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमा 22 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.