मुंबई : संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मात्र अजूनही या चित्रपटाचे टायटल सांगण्यात आलेले नाही. या चित्रपटामध्ये मनीषा कोयराला, अनुष्का शर्मा, विक्की कौशल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राजकुमार  हिराणी दिग्दर्शित या चित्रपटाची   निर्मिती विधू विनोद चोप्रा करणार आहेत. यापूर्वी या जोडीने 'मुन्ना भाई एमबीबीएस' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' यासारखे दोन हीट चित्रपट दिले आहेत.'पिके'. थ्री ईडियट्स' यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता राजकुमार हिरानींच्या आगामी चित्रपटाची अनेकांमध्ये उत्सुकता  आहे. संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार यांनी केले आहे.  दरम्यान संजय दत्तचे एका वेळी तीन रिलेशन सुरू असल्याची बातमी पुन्हा जोर धरू लागली आहे. खुद्द संजय दत्तने ही बातमी खरी असल्याचे म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीना मुनीमसोबतच्या रिलेशनची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली. रॉकी सिनेमात ती संजयसोबत काम करत होती. तसतर दोघेही लहानपणीचे मित्र होते. पण ही मैत्री प्रेमाच्या नात्यात बदलली. पण हे नात जास्त काळ टिरल नाही. कारण संजय आपल्या कामात व्यस्त राहिला आणि त्याच्या आयुष्यात ऋचा शर्माची एन्ट्री झाली. संजयने तिच्याशी लग्न केल पण ब्रेन ट्युमरमुळे १० डिसेंबरला तिचा मृत्यू झाला. त्यानंतर माधुरी दिक्षीतवर त्याचा जीव जडला. त्यांच्या अफेयरची चर्चा खूप रंगली. पण दोघांनीही ही चर्चा कधी सार्वजनिक ठिकाणी स्वीकारली नाही. लवकरच हे नातंही संपल. त्यानंतर कोणती ना कोणती मॉडेल किंवा अभिनेत्रीशी त्याच नाव जोडल गेल. आता या चर्चा बंद झाल्या आहेत. कारण त्याच्या आयुष्याला मान्यताची साथ मिळाली आहे. सुख दुखात मान्यता त्याच्यामागे ठाम उभी आहे. 


संजय दत्तच्या आयुष्यातील रोचक गोष्टी 


लवकरच त्याच्या आयुष्यातवर बनणाऱ्या संजू सिनेमातून त्याच्या रोचक कथेवरून पडदा उठेल. त्याच्या आयुष्यातील माहिती नसलेल्या आणि समोर न आलेल्या गोष्टीही सिनेमातून उघड होतील. एका मुलाखतीत संजय दत्तने स्वतः कबुल केले आहे की, तो एका वेळेस तीन मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण कधीच पकडला नाही गेला.


प्रेक्षकांना उत्सुकता 


संजू सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातील त्याचा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यात तो हुबेहुब संजय दत्तसारखा दिसतो. त्यानंतर सिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अत्यंत वाढली आहे. तर इतर भूमिका साकारतील