मुंबई : रणबीर कपूरचा सिनेमा 'संजू' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. भारतातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून बाहुबली 2 कडे पाहिलं जातं. आता 'संजू'ने 'बाहुबली 2' चा देखील रेकॉर्ड मोडला आहे. अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित 'संजू'ने एका दिवसात सर्वाधिक कमाई करून बाहुबली 2 चा रेकॉर्ड तोडला आहे. फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. 'संजू'ने 3 दिवसांत केलेल्या कमाईने बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडला आहे. तसेच एका दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा 'संजू' हा सिनेमा ठरला आहे. 


'संजू'ने 'बाहुबली-2' ला टाकलं मागे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरण आदर्श यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, 'संजू'ने इतिहास रचला आहे. एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे. 'संजू'ने बाहुबली 2 चा रेकॉर्ड तोडला असून या सिनेमाने तिसऱ्या दिवशी 46.50 करोड रुपये कमाई केली होती. मात्र 'संजू' यापुढे गेला आहे तिसऱ्या दिवशी 46.71 करोड रुपये कमाई केली आहे. 



परदेशात केली एवढी कमाई 


संजूचा रेकॉर्ड करण्याचा हा विक्रम आता परदेशांत देखील सुरू केला आहे. रणबीरच्या संजूने बाकीच्या सिनेमांना मागे टाकत रेकॉर्ड केले आहेत. ऑस्ट्रेलियात फक्त हिंदी भाषेत रिलीज झालेला 'संजू' हा सिनेमा नंबर वनवर राहिला आहे. ओपनिंग विकेंडबद्दल बोललं तर 'संजू'ने 'धूम3' 'पीके' 'सुल्तान' 'दंगल' 'बाहुबली 2 ' सारख्या सिनेमांना मागे टाकत नंबर 1 वर आली आहे. ऑस्ट्रेलियात ओपनिंग विकेंड कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर संजूने 6.38 करोड रुपये कमाई केली .