Indrayani Serial : आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'इंद्रायणी' मालिका महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचली आहे.  या मालिकेत इंदूची भूमिका करणारी बालकलाकार सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरतेय. तसेच अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना थक्क करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंद्रायणी' ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे छोट्या इंदूने दिग्रसकर वाड्यात प्रवेश केला असून ती आता तिथेच मुक्काम करणार आहे. तिथे ती प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना करत आहे तसेच ती येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला धाडसाने तोंड देत आहे; तर दुसरीकडे इंदूच्या नेहमी पाठीशी असलेले तिचे लाडके व्यंकू महाराज यांची तब्येत बिघडत चालली असून इंदूला महाराजांची अत्यंत काळजी वाटत आहे. एका साधू बाबांनी सांगितल्या प्रमाणे इंदूला व्यंकू महाराजांना वाचवण्याकरता मोठी कसोटी पार करावी लागणार आहे. 10 जूनपासून इंदूचा नवीन प्रवास सुरू होणार आहे. साधू बाबांनी इंदूला जी संजीवनी सांगितली होती.  इंदूने आता त्याच संजीवनीच्या शोधात आळंदीला जाण्याचे ठरवले आहे.  पण तिने निवडलेला हा प्रवास खूपच खडतर असणार यात काही शंका नाही. पैसे अपुरे असताना  आणि कसली माहिती नसताना तसेच एवढ्या लहानग्या वयातला तिचा हा आळंदीचा प्रवास कसा होईल. याशिवाय तिच्या या खडतर प्रवासात पाठीराखा म्हणून  साथ देणाऱ्या व्यक्तीची भूमिका संतोष जुवेकर साकारणार आहेत. संतोष जुवेकरची भूमिका इंदूच्या या प्रवासाला कशी मदत करेल आणि आता हे दोघे मिळून हा प्रवास कसा पार पाडणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


हेही वाचा : अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरात दरोडा, तब्बल 'इतकं' तोळं सोनं, रोकड लंपास


'इंद्रायणी' या मालिकेतील इंदूची जबरदस्त इच्छाशक्ती आणि तिचा हा आळंदीचा खडतर प्रवास … इंदूला व्यंकू महाराजांसाठी संजीवनी मिळवून देईल?? तिचं आराध्य दैवत असलेले श्री विठूमाऊली तिला कशी कशी साथ करतील, हे पाहायला विसरू नका….  दररोज संध्याकाळी 7 वाजता , फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर.