`हमको आजकल है..` वर सान्या मल्होत्रा थिरकली
माधुरी दीक्षितच्या गाण्यावर धरला ठेका
मुंबई : प्रत्येक मुलीमध्ये एक डान्सर लपलेली असते. माधुरी दीक्षितच्या सिनेमांनंतर प्रत्येकीला आपल्याला असं नाचता यायला हवं असं वाटतं असतं. असंच काहीस बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राला देखील वाटलं आहे. सान्या मल्होत्राने एक खास व्हिडिओ शेअर करून माधुरी दीक्षितची आठवण करून दिली आहे.
सान्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने 1990 च्या 'सैलाब' सिनेमागातील गाण्यावर डान्स केला आहे. "हमको आजकल है इंतजार..' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यावर सान्याने अगदी माधुरीसारखाच डान्स केला आहे.
सान्याने या व्हिडिओत पिवळ्या रंगाचा ब्लाऊज आणि निळ्या रंगाची चीन्स घातली आहे. व्हिडिओत सान्याने सांगितलं,'हमको आजकल है... डान्स करने का कारण मी खूप दिवस डान्स केलेला नाही.'या व्हिडिओला खूप लोकांनी पसंत केलं आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 4 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
कामाबद्दल बोलायचं झालं तर, जानेवारीत सान्या मल्होत्राचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'फोटोग्राफ' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर काही खास रिस्पॉन्स मिळालेला नाही. आता सान्या विद्या बालनसोबत 'शकुंतला देवी' सिनेमात काम करणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होत आहे.