मुंबई : हरियाणवी डान्सर सपना चौधरी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडते. गेल्या काही वर्षांत सपनाही कंट्रोवर्सीमुळे खूप चर्चेत आहे. आजकाल तिचं नाव चर्चेत आहे. मंगळवारी सपना एका जुन्या फसवणूक प्रकरणासंदर्भात न्यायालयात हजर राहिली होती.  एसीजेएम शंतनू त्यागी यांनी आरोपी सपना चौधरीला २५ मेपर्यंत सशर्त अंतरिम जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. तिच्या नियमित जामीन अर्जावर त्याच दिवशी सुनावणी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सपना चौधरी मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास न्यायालयात पोहोचली. तिने आत्मसमर्पणासह जामीन अर्ज सादर केला. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सशर्त अंतरिम जामीन अर्ज मंजूर केला. पाचच्या सुमारास आरोपी सपना चौधरीची सुटका करण्यात आली. याप्रकरणी 17 नोव्हेंबर 2021 रोजी सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.


खरंतर हे प्रकरण 2018 सालचं आहे. ऑक्टोबर महिन्यात लखनऊच्या आशियाना पोलीस स्टेशन परिसरातील स्मृती उपवनमध्ये 'दांडिया नाईट्स विथ सपना चौधरी' या लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आलं होतं. शोमध्ये सहभागी होण्यासाठी शेकडो लोकं 2500 रुपयांचे तिकीट घेऊन लाईव्ह कॉन्सर्टमध्ये पोहोचले होते. मात्र अचानक सपना चौधरीने परफॉर्म करण्यास नकार दिला होता. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि सपनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.


याच प्रकरणात, लखनऊच्या एसीजेएम 5 च्या न्यायालयाने त्याच प्रकरणात हजर न झाल्यामुळे सपनाविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. त्याच NBW ची आठवण म्हणून सपना चौधरी मास्क घालून कोर्टात पोहोचली. ताज्या माहितीनुसार, सपना चौधरीचे NBW परत बोलावण्यात आले आहेत. सपना चौधरीसह ६ आयोजकांविरुद्ध फसवणुकीचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.