सपना चौधरीच्या `तेरी आंख्या का यो काजल` या गाण्याचा धुमाकूळ
सोशल मीडियावर खूप वायरल
मुंबई : सपना चौधरीचं लोकप्रिय गाणं 'तेरी आंख्या का यो काजल' हरियाणी संगीत प्रेमींसाठी अतिशय लोकप्रिय आहे. हे गाणं अनेकदा जागोजागी डीजे पार्टी आणि लग्नांमध्ये हमखास वाजवलं जातं. हे गाणं स्टार डान्सर सपना चौधरीच्या डान्स परफॉर्मन्ससाठी अतिशय लोकप्रिय आहे. पण आता चित्र बदललं आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर अनेक लोकांनी ठेका धरलेला दिसत आहे.
सपनाने यावेळी पिवळ्या आणि गुलाबी रंगाचा सूट घातला आहे. यामध्ये सपना खूप सुंदर दिसत आहे. उत्तराखंडात पोहोचलेल्या सपना चौधरी अगदी पंजाबी लूकमध्ये दिसत आहे.
सपना चौधरीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. जेव्हापासून सपना बिग बॉस 11 मधून परतली आहे तेव्हापासून संपूर्ण देशात तिला उत्तम लोकप्रियता मिळाली आहे. सपना चौधरी बिहार ते अगदी कोलकातापर्यंत अतिशय लोकप्रिय आहे.
तिच्या लोकप्रियतेमुळे सपना लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करताना दिसणार आहे. तिच्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. सपना चौधरीने आपल्या करिअरची सुरूवात फार कमी वयापासून केली आहे.