मुंबई : हरियाणवी डान्सर सपना चौधरीला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. तिने स्वतःच्या बळावर स्वत:च वेगळं स्थान मिळवलं आहे. जिथं पोहोचणं प्रत्येकाला जमत नाही. सपना चौधरीच्या डान्स परफॉर्मन्सने लाखो लोकं थक्क झाले आहेत. सुरुवातीच्या काळात तिला स्टेज शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती डान्सदरम्यान एवढी धोकादायक स्टेप करायला जाते की, ती स्टेजवरच कोसळते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारी पडलं अशी स्टेप करणं
सपना चौधरी एकदम बिधांस्त स्टाईलमध्ये स्टेजवर डान्स करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण एक स्टेप करत असताना अचानक तिचा तोल बिघडतो आणि ती स्टेजवरच पडते. पण ती ताबडतोब उठते आणि काही झालंच नाही अशी रिएक्शन देते आणि मग ती पुन्हा डान्स करु लागते.  



चर्चेत आहे सपनाचं हे गाणं
सपना चौधरीचं 'पानी चलके' हे गाणं नुकतच रिलीज झालं असून, त्याला लोकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. काही दिवसांपूर्वी म्युझिक व्हिडिओ शेअर करत सपनाने लिहिलं होतं की, 'देसी गोडवा आणि बंगदार डान्स ते भरा गाणं 'पानी छलके' हे फक्त एक गाणं नाही तर तुमच्या देसी गाण्याच्या यूट्यूब चॅनलवरील एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे.