मुंबई : 'तेरी आंख्‍या का ये काजल..' गाण्यावर थिरकून अनेकांना घायाळ करणारी सपना अचानक वधू रुपात दिसली... आणि अनेकांच्या नजरा अर्थातच तिच्याकडे वळल्या. हरियाणवी डान्सर असलेली सपना चौधरी सोशल मीडियावर भलतीच प्रसिद्ध आहे. पण, सध्या मात्र सपना आपल्या डान्ससाठी नाही तर आपल्या नव्या फोटोशूटसाठी चर्चेत आहे. सपनानं पारंपरिक वधू वेशात एक फोटोशूट केलंय... यामध्ये ती लाल रंगाचा ड्रेस आणि ज्वेलरीसहीत वधूच्या रुपात दिसतेय. सपनाचं हे रुपही तिच्या चाहत्यांसाठी घायळ करणारं ठरतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१८ सालं सपनाच्या करिअरसाठी खूपच महत्त्वाचं ठरलं. बिग बॉस सीझन ११ मध्ये एका स्पर्धकाच्या रुपात सपना छोट्या पडद्यावर घराघरांत पोहचली होती. या कार्यक्रमात सपनाला विजेता तर होता आलं नाही पण आपल्या वागण्या-बोलण्यातून सपनानं अनेकांची हृदय जिंकली. सध्या सपनाकडे कोणतं खास प्रोजेक्ट नसलं तरी ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यानं सतत चर्चेत असते. 



सपनाच्या इन्स्टाग्रामवर तिला १.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. आपल्या टॅलेंटसहीत सपनानं बॉलिवूडपासून ते भोजपुरी सिनेमापर्यंत चांगलंच नाव कमावलंय. 


या वर्षाच्या सुरुवातीलाच गोव्यात पार पडलेल्या एका कार्यक्रमात 'तेरी आंख्‍या का ये काजल..' या गाण्याच्या परफॉर्मन्सनंच सपनानं आपल्या नव्या वर्षाची सुरुवात केली होती. सपनाच्या एका फॅन पेजनं इन्स्टाग्रावर तिचा हा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यालाही तिच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळालाय.