मुंबई : लोकप्रिय हरियाणवी गायिका आणि डान्सर सपना चौधरी बिग बॉसचा भाग झाल्यापासून तिची लोकप्रियता अजून वाढली आहे. पण, याआधीही सपना बरीच चर्चेत असायची त्याचबरोबर बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सपनाच्या स्टाईल आणि लुकमध्ये खूप फरक दिसून आला आहे. आज सपनाची शैली लोकांना खूप प्रभावित करते. पूर्वीच्या तुलनेत सपनाचं वजनही खूप कमी झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉस 11 मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेली सपना चौधरी तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल झाली होती. सपनाने तिचं वजन कमी करण्यासाठी केवळ वर्कआउट केलं नाही, तर तिने तिच्या आहारात अनेक बदल केले. आपल्या सगळ्यांना माहित आहे की, सपना चौधरी एक डान्सर आहे. याद्वारे तिने बरंच वजन कमी केलं. मीडिया रिपोर्ट्स नुसार सपनाने वजन कमी करण्यासाठी थंड पाणी पिणे बंद केलं. सपना तिच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्यात लिंबाच्या रसाने करते.


सपनाचा डाईट प्लान
नाश्ता: सपनाला हेव्ही नाश्ता करायला आवडतो. ज्यामध्ये ती मल्टीग्रेन ब्रेड, आणि अंड खाते
दुपारचं जेवण: सपना मुख्यतः प्रथिनयुक्त पदार्थ घेते. तसंच हिरव्या पालेभाज्या, चीज आणि रोटी खाते.
रात्रीचे जेवण: रात्री सपना बॉईल चिकन, सूप आणि सलाद खाते. सपना नेहमी तिचं जेवण संध्याकाळी 7.30 च्या आधी घेते.
स्नॅक्स: सपना चहाऐवजी नारळाचं पाणी पिणं पसंत करते.