मुंबई : हरियाणवी गायिका-डान्सर सपना चौधरीने इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिला आता कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. सपनाचा स्टेज शो पहायला दुरून लोकं येतात. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. अलीकडेच एका शोदरम्यान सपनाची तब्येत बिघडली होती. सपनाच्या ढासळत्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर चाहत्यांना तिची खूप काळजी वाटत आहे. आता सपनाने स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हॉस्पिटलमध्ये हळूहळू चालताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये सपना हॉस्पिटलमध्ये लंगडत चालताना दिसत आहे. व्हिडीओतील सपनाची अवस्था पाहून ती खूप आजारी असल्याचं म्हणता येईल. सपनाने व्हिडीओ शेअर करण्यासोबतच तिचे हेल्थ अपडेटही दिले आहेत. व्हिडिओ शेअर करत सपनाने लिहिलं की, आता मी पूर्णपणे बरी आहे. तुमच्या सगळ्या आशीर्वादांसाठी खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटू. सपनाची अशी अवस्था पाहून तिचे चाहते काळजीत पडले आहेत. कमेंट करून तिला तिच्या स्थितीबद्दल विचारत आहे.


चाहते चिंतेत
सपनाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी खूप कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिलं की, तू आता ठीक आहेस का? तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, मॅडम लवकर बरे व्हा. एका यूजरने लिहिलंय की, तुला काय झालंय?


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


काही दिवसांपूर्वी सपना लाईव्ह शोसाठी रामपूरच्या बघेलन ईथे गेली होती. जिथे शो दरम्यानच सपनाची तब्येत बिघडली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे ट्रिटमेंट झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आलं. सपनाला डॉक्टरांनी त्यावेळी काही चाचण्या करण्याचा सल्ला दिला होता.