मुंबई :  'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली अभिनेत्री सारा अली खान सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. चाहते तिच्या सौंदर्याचे तर दिवाणे आहेतच पण त्यांना तिचा अभिनय आणि बोलण्याचा अंदाज देखील आवडत आहे. साराच्या मुलाखती प्रेक्षकांना अतिशय आवडत आहेत. पण सारा अली खानच्या आजूबाजूला सगळं सुरळीत सुरू असताना मात्र तिच्या संकटात वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी संध्याकाळी सारा अली खान आणि त्याची आई अमृता सिंह देहरादून पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. देहरादूनमध्ये साराच्या मामाची करोडोंची जमीन आहे. या जमिनीवर भू-माफियांची करडी नजर आहे. या कारणामुळे सारा आणि तिच्या आईला भीती देखील आहे की, ही जमिन भू माफिया हडप करू शकतात. गेल्या शनिवारी मामा मधुसुदन बिमबेट यांच निधन झालं. त्यांना कॅन्सरचा त्रास होता. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अमृता देहरादूनला निघून गेली. 


अंतिमसंस्कारमध्ये सारा आणि अमृता सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर दोघींनी पोलीस स्थानकात जावून त्या भू माफियांविरोधात तक्रार दाखल केली आहे. अमृताने पोलिसांना सांगितलं की, मामा मधुसूदन एकटेच राहत असतं त्यामुळे त्यांचे कुटुंबिय येत नाहीत तोपर्यंत या जमिनीची काळजी पोलिसांनी घ्यावी. 


4 एकर असलेल्या या जमिनीवर भू माफियांची करडी नजर आहे. अमृता सिंह मुंबईत आल्यावर या जमिनीबाबत त्यांनी कोणता गोंधळ घालू नये म्हणून पोलिसात तक्रार दाखल केली आहे.