मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांप्रमाणेच त्यांचे किड्स देखील चर्चेत असतात. फॅन्स आपल्या कलाकारांप्रमाणेच स्टार किड्सचे अपडेट ठेवण्यात देखील उत्सुक असतात. अशीच आता चर्चेत आहे सैफ अली खानची मुलगी. सारा अली खान हल्ली आपल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आहे. आता ती एका बॉलिवूड अभिनेत्याबरोबर केदारनाथच्या दर्शनाला गेल्याची चर्चा  जोरदार रंगली आहे. 


सारा अली खानचं काय आहे हे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. 'केदारनाथ' या सिनेमातून सारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत डेब्यू करत आहे. हा सिनेमा नोव्हेंबर 2018 मध्ये रिलीज होणार आहे. हे दोघे आता केदारनाथच्या दर्शनाकरता गेले आहेत. तिथला या दोघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



सारा अली खानचा हा सिनेमा अगदी सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अगदी आता या सिनेमाचं शुटिंग पूर्ण झालं आहे. अभिषेक कपूर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने 'धडक' या सिनेमातून डेब्यू केला आहे. आता या पाठोपाठ सैफ अली खानची मुलगी डेब्यू करत आहे. त्या अगोदर तिचा हा फोटो व्हायरल झाला होता. मंदिरात सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान देवाची प्रार्थना करत असताना दिसत आहेत.