Sara Ali Khan Engagement: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने कमी वेळातच प्रसिद्धी मिळवली आहे. सोशल मीडियावरदेखील ती खूप अॅक्टिव्ह असते. सारा अली खान तिच्या चित्रपटांबरोबर लव्ह लाइफबाबतही चर्चेत असते. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पासून ते खेळाडू शुभमन गिलसोबतही तिचे नाव जोडले गेले आहे. मात्र, आता सारा अली खानचे नाव एक बिझनेसमॅनसोबत जोडले गेले आहे. तसंच, तिने गुपचुप साखरपुडाही उरकल्याचे बोललं जातं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा अली खानने एका श्रीमंत बिझनेसमॅनसोबत साखरपुडा केला आहे. तसंच, लवकरच ते दोघं लग्न करणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला गेला आहे. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे, सारा अली खानचा साखरपुडा झाला असून या वर्षीच ती लग्न करणार आहे. ती लवकरच मेट्रो इन दिनो या चित्रपटाचे शुटिंग संपवणार आहे. तिने आता कोणताही नवीन चित्रपट घेतला नाहीये. ती लवकरच तिच्या लग्नाच्या तयारींसाठी वेळ देणार आहे. 


खान कुटुंबीयांकडून नात्याला मंजुरी?


पोस्टमध्ये हादेखील दावा केला आहे की, ज्या व्यक्तीसोबत सारा अली खान लग्न करणार आहे तो तिच्यावर खूप प्रेम करतो. सारा खूप आनंदी आहे आणि तिच्या कुटुंबीयांनी देखील त्यांच्या नात्याला मंजुरी दिली आहे. मात्र, या पोस्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्याला सारा अली खान व त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाहीये. 



दरम्यान, सारा अली खानचे वय सध्या 28 वर्षे इतके आहे. रणवीर इलाहाबादियाच्या चॅट शोमध्ये तिने म्हटलं होतं की, ती वयाच्या 32व्या वर्षी लग्न करणार आणि 35 व्या वर्षी मुलांचा निर्णय घेणार. त्यामुळं सारा अली खानने खरंच साखरपुडा केलाय का? याला अद्याप दुजोरा मिळालेला नाहीये. 


सारा अली खानचं फिल्मी करिअर


सारा अली खानने 2018मध्ये केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत तिने काम केले होते. बॉक्स ऑफिसवर मात्र हा सिनेमा फार काही चालला नव्हता. त्यानंतर 2023 साली आलेल्या जरा हटके जरा बचके हा चित्रपट हिट झाला होता. त्या व्यतिरिक्त ओटीटीवरही अभिनेत्रीच्या अनेक सिरीज हिट झाल्या आहेत. साराची मर्डर मिस्ट्री चित्रपट मर्डर मुबारकदेखील प्रक्षकांना आवडला होता. नेटफ्लिक्सवर ही सीरीज रिलीज झाला होता.