Sara Ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सध्या जरा हटके जरा बचके या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. सारा तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. कधी साराला तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तर कधी मंदिरात गेल्यामुळे ट्रोल करण्यात येत. सारा ही सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. साराचे अनेक रिल सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून तर सारा ही क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दोघांना बऱ्याचवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. दरम्यान, आता सारानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला कशा प्रकारच्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे हे सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा अली खान किंवा शुभमन गिल या दोघांनी याबातमीवर दुजोरा दिलेला नाही. पण तिला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की ती आजी शर्मिला टागोर यांच्याप्रमाणेच कोणत्या क्रिकेटरशी लग्न करणार का? हा प्रश्न ऐकताच सारा अली खान तिला नेमका कसा मुलगा हवा आहे याविषयी सांगताना, म्हणाली मी ज्या व्यक्तीशी लग्न करेन ती व्यक्ती क्रिकेटर किंवा उद्योगपती असू शकते, पण मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या त्याचे विचार माझ्याशी जुळले पाहिजे. माझा जोडीदार होण्यासाठी तो क्रिकेटर, व्यावसायिक, डॉक्टर असणे आवश्यक आहे असं मला वाटतं नाही. पण आमच्या दोघांचे विचार आणि मन जुळणं फार महत्वाचं आहे.”


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या भारतीय क्रिकेट संघातील कोणाला डेट करत आहेस का? असा प्रश्न विचारता सारा म्हणाली की, “जे आहे ते मी तुम्हाला सत्य सांगेन. मला असं वाटतं आणि मी पूर्ण शाश्वतीनं सांगू शकते की मला जशी व्यक्ती पाहिजे अद्याप मी अशा व्यक्तीला भेटले नाही ज्याबरोबर मी सेटल होऊ शकेन. मला असा जोडीदार भेटला नाही." 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, साराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर सारा अली खान लवकरच ए वतन मेरे वतन या चित्रपटात दिसणार आहे. त्यासोबतच सारा अनुराग बासुच्या मेट्रो ही गिनो या चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त मर्डर मुबारक या चित्रपटात सारा दिसणार आहे. तर या चित्रपटात तिच्यासोबत करिश्मा कपूर आणि विजय वर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.