मुंबई : फिल्मिस्तान सिनेमाचे दिग्दर्शक नितीन कक्कड यांनी आपल्या आगामी सिनेमासाठी स्टार कास्टला निवडण्याचा निर्णय घेतला आहे. नितीन आपल्या आगामी सिनेमात सैफ अली खानची मुलगी सारा अली खान घेणार होते. मिळालेल्या माहितीनुसार हा सिनेमा 2019 मार्चमध्ये सुरू होणार होता. या सिनेमाचं शुटिंग मुंबई आणि लंडनमध्ये होणार होतं. सैफ आणि साराने अद्याप या सिनेमाच्या कॉन्ट्रक्टवर सही केलेली नाही. पण त्यांनी हा सिनेमा करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. आता निर्माते या सिनेमासाठी साराच्या आईची भूमिका करणाऱ्या व्यक्तीच्या शोधात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता हाती आलेल्या माहितीनुसार, हा प्रोजेक्ट संकटात सापडला आहे. सारा अली खानने या सिनेमात काम करण्यास नकार दिला आहे. तिने 'हिंदी मीडियम' या सिनेमांत काम करण्यासाठी आपल्या डेट्स दिल्या आहेत. सारा लवकरच रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. साराच्या 'केदारनाथ' या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख सारखी बदलत असल्यामुळे ती बहुदा 'सिम्बा' सिनेमातून डेब्यू करेल.


हिंदी मीडियम या सिनेमाच्या सिक्वलमध्ये सारा अली खान दिसणार आहे. इरफान खान आजारी असल्यामुळे हा प्रोजेक्ट बरेच दिवस लांबला आहे. मात्र दिग्दर्शकांनी इरफान खानला स्क्रिप्ट ऐकवली आहे. आणि त्याला हा सिनेमा आवडला असून लवकरच तो या सिनेमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं आहे.