लंडनमधील वैद्यकीयअभ्यासापासून ते मॉडलिंगपर्यंत अशी आहे Sara Tendulkar ची कहाणी
सारा तेंडुलकर ही दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांची सर्वात मोठी मुलगी आहे.
मुंबई : सारा तेंडुलकर ही दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांची सर्वात मोठी मुलगी आहे. साराची सध्या नेटिझन्समध्ये प्रचंड लोकप्रियता आहे. सारा काय करते? कुठे जाते हे लोकांना पाहायला आवडते. हल्लीच साराने आपल्या मॉडलिंगल करिअरची सुरूवात केली, ज्यानंतर तिची प्रसिद्धी आणखी वाढली. सारा देखील सोशल मीडिाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट करत असते, ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.
साराचे इन्स्टाग्रामवर 17 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून देखील आपल्या चाहत्यांना स्वतःबद्दल अपडेट करत असते. ती नुकतीच गोव्याला गेली होती. तिथूनही तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. ते फोटोही चांगलेच व्हायरल होत आहेत.
अनेकांना साराच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला फार उत्सुक्ता आहे. साराचे शिक्षण किती झाले? तिने मॉडलिंगच्या जगात कसे पाऊल टाकले याबद्दल अनेकांना जाणून घेण्याची इच्छा आहे, तर आज आम्ही तुम्हाला साराच्या आयुष्याबद्दल काही अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्या फार कमी लोकांना माहित आहे.
सारा तेंडुलकरने वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने मॉडेलिंगमध्येही पदार्पण केले आहे. सारा तेंडुलकरने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केले. यानंतर ती लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेली.
दरम्यान, सारा तेंडुलकर भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिलला डेट करत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, या विषयावर दोन्ही बाजूंकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र, सारा तेंडुलकर इंस्टाग्रामवर काही क्रिकेटपटूंनाच फॉलो करते, त्यापैकी शुभमन गिल एक आहे.
सारा तेंडुलकरने अलीकडेच एका उच्च श्रेणीतील कपड्यांच्या ब्रँडसह मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. अभिनेत्री बनिता संधू आणि तानिया श्रॉफसोबत साराने मॉडेलिंगमध्ये पदार्पण केले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1997 मध्ये सहारा कपमध्ये भारताच्या नेत्रदीपक विजयानंतर सचिन तेंडुलकरने आपल्या मुलीचे नाव सारा ठेवले होते. त्या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व सचिन तेंडुलकरने केले होते. कर्णधार म्हणून सचिन तेंडुलकरचा टूर्नामेंटमधला हा पहिलाच विजय होता.
सारा तेंडुलकरला प्रवासाची खूप आवड आहे. इंग्लंड व्यतिरिक्त तिने फ्रान्स, इंडोनेशिया, दुबई यांसारख्या देशांचा प्रवास केला आहे.