Vaibhavi Upadhyaya passes away : साराभाई व्हर्सेस साराभाई' या शोमध्ये चमेलीची भूमिका करणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचं कार अपघातात निधन झालं आहे. मंगळवारी हिमाचल प्रदेशात एका वळणावर तिची कार दरीत कोसळली. या दुर्घटनेत तिच्या मृत्यू झाला आहे. निर्माता-अभिनेता जेडी मजेठिया यांनी या घटनेची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. या दुर्घटनेच्या वेळी वैभवीचा मंगेतरही कारमध्ये होता. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैभवी हिचे कुटुंब चंदिगढमधून तिचं पार्थिव आज मुंबईत आणतं आहे. आज सकाळी 11 वाजता वैभवीवर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 



जेडी मजेठिया यांनी पोस्टमध्ये तिच्याबद्दल लिहाताना अतिशय भावूक झाले. "एक अतिशय चांगली अभिनेत्री, प्रिय मैत्रिण वैभवी उपाध्याय, जिला साराभाई विरुद्ध साराभाईची 'जस्मिन' म्हणून ओळखले जाते, त्यांचं निधन झालंय. वैभवीच्या आत्म्याला शांती लाभो." 



रुपाली गांगुली झाली भावूक


टीव्ही मालिका अनुपमा फेम आणि साराभाई विरुद्ध साराभाईमधील सहकलाकार रुपाली गांगुलीनेही वैभवीचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करुन तिला श्रद्धांजली वाहिली आहे. (Sarabhai Vs Sarabhai actor Vaibhavi Upadhayay dies in a road accident mumbai )



वैभवीने 2020 मध्ये 'छपाक' सिटी लाइट्स आणि 'तिमिर' (2023) या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.



गुजराती थिएटरमध्ये ती लोकप्रिय होती. टीव्ही शो 'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकेशिवाय तिने 'क्या कसूर है अमला का' आणि 'प्लीज फाइंड अटॅच्ड' या डिजिटल मालिकेतही काम केलंय.