मुंबई : अभिनेत्री सारा अली खानने फार कमी कालावधीत कलाविश्वात आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे. सौंदर्यासोबतच तिने तिच्या अभिनयाने आणि स्वभावाने सर्व चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. आतापर्यंत रुपरी पडद्यावर दाखल झालेल्या तिच्या प्रत्येक चित्रपटाला चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. नेहमी चाहत्यांच्या चर्चेचा विषय असणारी सारा सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. परंतू बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात तिचं नाव पुढे आल्यापासून ती सोशल मीडियापासून दूर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहत्यांसोबत भेटीचे व्हिडिओ देखील ती कायम शेअर करत असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय आपल्या आवडीच्या कलाकाराबद्दल, त्यांच्या वैयक्तीक आयुष्यबद्दल जाणून घ्यायची इच्छा तर प्रत्येक चाहत्याची असते. 


दरम्यान, साराने एका शोमध्ये मोठा खुलासा केला होता. या शोमध्ये ती वडील आणि अभिनेता सैफ अली खानसोबत आली होती. तेव्हा तिने अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न आणि अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली. 


सारा तिचे वडील सैफ अली खानसोबत करण जोहरच्या 'कॅफी विथ करण' या शोमध्ये आली होती. तेव्हा तिने आपल्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल दिलखुलास गप्पा केल्या होत्या. करणने तिला एक वैयक्तीक प्रश्न केला होता. तेव्हा तिने वडिलांसमोर या प्रश्नाचे उत्तर दिली होते. 


सारा म्हणाली, मला करीनाचा भाऊ रणबीर कपूरसोबत लग्न करायचं आहे. पण रणबीला डेट करायचं नाही आणि अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करायचं असल्याची इच्छा व्यक्त केली होती.