मुंबई: सरदारजी आणि डान्स यांचे एक अनोके नाते आहे. कदाचीत त्याचमुळे अनेक पब, पार्ट्या आणि समारंभांमधून पंजाबी गाणी वाजवली जातात. ही गाणी जशी डिंच्याक असतात तसाच सरदारजींचा डान्सही डिंच्याक असतो. पण, यात एखादा सरदारजी जर नशेत टल्ली असेल. तर, मग तो डान्स पाहण्यासारखाच असतो. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात नशेत टल्ली झालेल्या सरदारजींच्या हटके डान्स स्टेप तुम्हाला खिळवून ठेवतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचे म्हणजे डान्स करणाऱ्या सरदारजींसमोरच्या टेबलवर असलेल्या ग्लासमध्ये रंगीत पदार्थ दिसत आहे. तो पदार्थ पाणी आहे की, आणखी काही याबबत स्पष्टता नाही. पण, सरदारजींच्या डान्स स्टेप मात्र फूल एंटरटेनींग आहेत. तुम्हालाही या स्टेप्स करायच्या असतील तर करू शकता. पण, थोडी काळजी घ्या. नाहीतर आपटी खाण्याची शक्यता अधिक. खास करून खुर्ची उचलून केलेल्या स्टेप्स.