सारेगमपचे `पंचरत्न` परीक्षक का होतायेत ट्रोल?
नेटकऱ्यांनी या पंचरत्नांना ट्रोल करायला सुरुवात केली असून सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.
मुंबई : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'ची सध्या सगळीकडे क्रेझ पाहायला मिळतेय. नव्या पर्वाचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांची या कार्यक्रमाला मोठी पसंती मिळतेयं. मागील पर्वातील पंचरत्न अर्थात रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, आणि कार्तिकी गायकवाड हे परिक्षकाच्या भूमिकेत समोर आले आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमातील 14 लिटिल चॅम्प्स या स्पर्धेत प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी या स्पर्धेत एलिमिनेशन होणार नाहीये. छोट्या दोस्तांना आपलं टॅलेंट संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची संधी देणारा हा मंच आहे.
यात फक्त गाणारेच लिटिल चॅम्प्स नाही, तर वादक देखील काही छोटे दोस्त प्रेक्षकांच्या भेटीस येतील. यात सामील सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस गाणी सादर करत आहेत. मात्र, दादा-ताई अर्थात ज्युरी बनून खुर्चीवर विराजमान ‘पंचरत्न’ त्यांच्या स्टाईलमुळे ट्रोल होत आहेत.नेटकऱ्यांनी या पंचरत्नांना ट्रोल करायला सुरुवात केली असून सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.
नेटकऱ्यांच्या मते, स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक उत्तम सादरीकरण करत आहेत. मात्र, परिक्षकांचे एकसारखे हावभावांमुळे मीम मेकर्सचा निशाणा बनले आहेत. याबाबतचे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.