वहिनीसोबत अभिनेत्याचा रोमॅन्टिक डान्स; व्हिडीओ व्हायरल
ते दोघंही चक्क रोमॅन्टिक डान्स करताना दिसत आहे
मुंबई : दर दिवशी व्हायरल होणाऱ्या असंख्य व्हिडीओमध्ये सध्या नेटकऱ्यांच्या नजरा वळतोय तो म्हणजे एका अभिनेत्रीनं रस्त्यावर केलेल्या डान्सचा व्हिडीओ. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे, ऑनस्क्रीन दीराच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्यासोबत ती चक्क रोमॅन्टिक डान्स करताना दिसत आहे.
ही अभिनेत्री म्हणजे 'साथ निभाना साथिया' (Saath Nibhaana Saathiya) मध्ये गोपी बहूची भूमिका साकारणाची देवोलिना भट्टाचार्जी. देवोलिना आणि अभिनेता विशाल सिंह हे या व्हिडीओमध्ये दिसत असून, त्यांची केमिस्ट्री सर्वांच्याच भुवया उंचावून जात आहे. देवोलिनाप्रमाणंच विशालनंही हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला असंख्य व्हूज आणि लाईक्स मिळाले आहेत.
'साथ निभाना साथिया' (Saath Nibhaana Saathiya) या मालिकेच्या वेळी विशाल आणि देवोलिनानं फार कमी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या मालिकेमध्ये विशाल एका आदर्श दीराच्या भूमिकेत झळकला होता.
दरम्यान, ऑनस्क्रीन वहिनीसोबत त्यानं केलेला हा रोमॅन्टिक डान्स पाहून प्रथमत: त्यांच्या केमिस्ट्रीची अनेकांनीच दाद दिली आहे. तर, वहिनीसोबत डान्स करणाऱ्या तिच्या ऑनस्क्रीन दीराला काहींनी ट्रोलही केलं आहे. काही असो, पण या जोडीचा हा 'स्ट्रीट डान्स' यामुळं व्हायरल होतोय हेसुद्धा तितकंच खरं.