Satish Kaushik Death : बॉलिवूड विश्वातून धक्कादायक बातमी आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहितं ही माहिती दिली आहे. राम लखनमध्ये अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांची जोडी हिट होती. 


अलविदा दोस्त!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतीश कौशिक आणि अनुपम खेर हे जवळचे मित्र होते. सतीश कौशिकसोबतचा एक फोटो शेअर करत अनुपम खेर म्हणाले की,  मला माहित आहे “मृत्यू हे या जगाचे शेवटचे सत्य आहे! पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिक बद्दल हे लिहीन असे स्वप्नातही वाटले नव्हते . 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम!! सतीश तुझ्याशिवाय आयुष्य कधीच सारखे होणार नाही! ओम शांती!



वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विशेष बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच सतीश कौशिक यांनी सर्वांसोबत होळी खेळली होती. सिने कलाकार आणि चित्रपसृष्टीतील इतर लोकांसोबत खेळलेल्या या होळीचे सर्व फोटो त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्टही केले होते. अशात अचानक झालेल्या त्यांच्या निधनाने चाहत्यांसोबतच सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी हा मोठा धक्का आहे.




सतीश कौशिक यांचा अल्पपरिचय


  • सतीश कौशिक हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते होते. 

  • सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणातील महेंद्रगडमध्ये झाला होता.   

  • सतीश यांचं सुरुवातीचं शिक्षण दिल्लीच्या करोलबागमधून झालं. त्यानंतर करोरीमल कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केली.

  • सतीश यांनी हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून 1978 सालचा पासआउट झाले.

  • 1979 मध्ये सतीश आपली स्वप्नं घेऊन मुंबईत आले.

  • सतीश यांनी 'मासूम' चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली.

  • 'रूप की रानी चोरो के राजा' या चित्रपटातून सतीशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं.

  • सतीश यांचा सर्वात अविस्मरणीय चित्रपट म्हणजे मिस्टर इंडिया, ज्यामध्ये त्याने कॅलेंडरची भूमिका केली होती.

  • सतीश यांना दोनदा सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहेत.



सतीश कौशिक यांची 5 प्रसिद्ध पात्रं


'साजन चले ससुराल' या चित्रपटात सतीश कौशिक यांनी मठ स्वामीची भूमिका साकारली होती. त्यांचा दक्षिण भारतीय शैलीने प्रेक्षकांना खूप हसवले. या चित्रपटात कौशिक गोविंदाच्या मित्राच्या भूमिकेत दिसले होते. 


1997 मध्ये आलेल्या 'मिस्टर अँड मिसेस खिलाडी' चित्रपटात सतीश कौशिक यांनी अक्षय कुमारच्या मामाची भूमिका साकारली होती.


डेव्हिड धवनच्या 'हसीना मान जायेगी' या कॉमेडी चित्रपटात सतीश कौशिकने कादर खानच्या पर्सनल असिस्टंटची भूमिका साकारली होती.


1987 मध्ये रिलीज झालेल्या 'मिस्टर इंडिया' चित्रपटात सतीश कौशिक यांनी कॅलेंडर नावाच्या कुकची भूमिका केली होती.


कौशिकने डेव्हिड धवनच्या कॉमेडी चित्रपट 'क्यूंकी मैं झुठ नहीं बोलता'मध्ये गोविंदाच्या मित्र मोहनची भूमिका केली होती.