Satyaprema Ki Katha Box Office Collection: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कार्तिक आर्यनच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाची. 29 जूनला त्याचा हा मोस्ट अवेडेट चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याच्या या चित्रपटाला सुरूवातीला थंड प्रतिसाद मिळताना दिसत होता. परंतु अनेकांना हा चित्रपट आवडला असल्याचे सांगितले आहे. ट्विटरवरही या चित्रपटाला चांगले रिव्ह्यूज येताना दिसत आहेत. परंतु 'आदिपुरूष'नंतर आता कार्तिक आर्यनच्या 'सत्यप्रेम की कथा'लाही प्रेक्षकांनी थंड प्रतिसाद दिल्यानं पुन्हा एकदा बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवरील भविष्यावर अनेकांनी प्रश्नदेखील उपस्थित केले आहेत. त्यामुळे एकीकडे बॉलिवूडच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यावर आणि प्रादेशिक चित्रपटांना प्रेक्षक पसंती देत असताना आता परत या चर्चांना उधाण आले असले तरी आता समोर आलेल्या माहितीनुसार कार्तिक आर्यनच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील आकाडे वाढताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेड विश्लेषकांनुसार, आता 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसच्या आकड्यांमध्ये 68 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटानं पहिल्या दिवशी थंड कमाई केली होती. 10 कोटीही या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमाई केली नव्हती. त्यामुळे आता यापुढे या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील भविष्य कसे असेल याबाबतही चर्चा रंगलेली असताना आता या चित्रपटाला विकेंडचा चांगला फायदा मिळताना दिसतो आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही याचा सकारात्मक परिणाम होताना दिसतो आहे. 


दुसऱ्याच दिवशी या चित्रपटानं सर्वात कमी कमाई केली होती. या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 7 कोटी कमावले होते. जे पहिल्या दिवसापेक्षा 2 कोटींनी कमी होते. त्यानंतर या चित्रपटानं काल म्हणजे शनिवारी तब्बल 11.75 कोटी कमावले आहेत. म्हणजेच या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 68 टक्क्यांची वाढ झाली आहे. आतापर्यंत या चित्रपटानं 28 कोटी कमावले आहेत. त्यामुळे एकूणच या चित्रपटाची यापुढे येत्या विकेंडची कमाई ही 40 कोटींपर्यंत जाऊ शकते अशी शक्यता दिसते आहे. गुरूवारी या चित्रपटानं 9.25 कोटी कमावले आहेत. शुक्रवारी या चित्रपटानं 7 कोटी रूपये कमावले होते. ज्यात 24 टक्क्यांची घट झाली होती. तर शनिवारी म्हणजे काल 11.75 कोटी रूपये कमावून या चित्रपटानं 68 टक्क्यांची वाढ केली आहे. 


हेही वाचा - हेमांगी कवीनं इंटरनेटवर लावली आग! स्विमिंग पूलमधले बिकीनी फोटो केले शेअर; नेटकरी म्हणाले...


सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटातून कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची जोडी एकत्र दुसऱ्यांदा पाहायला मिळते आहे. त्यामुळे आता हा चित्रपट चांगली कमाई करेल असे चिन्ह दिसते आहे.