Savlyachi Janu Savali : झी मराठीवर 'सावळ्याची जणू सावली' ही मालिका काही दिवसांपूर्वीच आपल्या सगळ्यांच्या भेटीला आली. या मालिकेत सध्या सावली आणि सारंगची गोष्ट एक मनोरंजक वळण घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. सारंगला फोन येतो की त्यांच्या कंपनीच्या नावाखाली डुप्लिकेट प्रॉडक्ट्स विकले जात आहेत. सावली मैत्रिणीच्या हळदीला आलेली असताना सगळ्यांच्या आग्रह खातर ती गाणं गाते. तिच्या गाण्याचे सूर सारंगच्या कानावर पडतात आणि तो त्याला ताराचा आवाज समजून आवाजाचा शोध घेत त्या घराजवळ पोहोचतो. सावली सारंगला पटवून देते की ताराचं रेकॉर्डेड गाणं वाजत होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर सारंग डुप्लिकेट प्रोडक्ट्स बनत असलेल्या गोडाऊनला पोहोचतो आणि गुंडांना बेदम मारतो, गोडाऊनच्या बाहेर सारंगची मारामारी सुरू असताना एक लहान मुलगी आगीमध्ये अडकलेय. सावली आणि सारंग एकत्र तिला वाचवतात. जगन्नाथ, तिलोत्तमाला सांगतो की सारंगच्या लग्नाचा योग आहे आणि लवकरच ती मुलगी त्याच्या आयुष्यात प्रवेश करेल. भैरवीला सावली हळदीमध्ये गायल्याचं कळतं, भैरवी सारंग आणि सावलीला एकत्र बघते आणि अजून भडकते. सावलीच घराणं संगीत कलेशी निगडित आहे म्हणून सावलीला सारंग गाणं म्हणायला सांगतो, पण सावली तिला गाणं येत नसल्याचं सांगते. भैरवी सावलीला नियम मोडला म्हणून खडसावते, सावली शपथ घेते की असं परत होणार नाही. तिलोत्तमा घरच्यांना सारंगसाठी मुलगी शोधण्याच्या निमित्ताने ब्युटी काँटेस्ट आयोजीत करत असल्याचं सांगते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आता नियती नियती सारंग आणि सावलीला एकत्र आणेल ? भैरवी, सावलीने नियम मोडल्यामुळे काय शिक्षा ऐकवेल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे बघायला विसरू नका 'सावळ्याची जणू सावली' दररोज ७:०० वा फक्त झी मराठी वाहिनी वर.


काय आहे मालिकेचा सार?


या मालिकेत्या नावातूनच एक गोष्ट सगळ्यांना कळली ती म्हणजे या मालिकेची कथा ही एका सावळ्या मुलीच्या आयुष्यावर आहे. त्या मुलीचं नाव सावली असून ती रंग रूपानं साधारण, पण स्वभावाने प्रेमळ, शब्दाची पक्की आणि अत्यंत सुरेल आवाजाची आहे. सावली बारावीपर्यंत शिकली आहे आणि तीच स्वप्न हे संगीतात MA करायचं.  विठ्ठलावर अपार श्रद्धा असलेली, कितीही विपरीत स्थितीतून मार्ग निघू शकतो अशा आशावादी विचारांची कुटुंबावर अपाड प्रेम करणारी... सावलीच्या जन्मावेळी एक मोठी उलाढाल होते. कान्हुच्या पोटी जन्माला आलेली ही सावळ्या रंगाची मुलगी जन्मल्यावर श्वास घेत नसल्यामुळे, एकनाथला मेलेली मुलगी झाली अशा निष्कर्षापर्यंत गाव पोहोचत असताना  एकनाथ आपल्या मुलीला विठ्ठलाच्या चरणी ठेवतो आणि चमत्कार होतो. मुलीत प्राण फुकले जातात म्हणून तिचं नाव सावली ठेवले जाते.