ब्रेस्ट साईज काय तुमची? ऐकताच अभिनेत्रीच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि....
पाहा या अभिनेत्रीनं काय केलं ?
मुंबई : बॉडी शेमिंग हा प्रकार आता कोणासाठीही नवा राहिलेला नाही. जीवनात असा एकतरी प्रसंग आला असेल जिथं तुम्हाला याटा सामना करावा लागला असेल. आम्ही नाही बुवा असं काही अुभवलं असं म्हणणारे कमीच. सध्याच्या घडीला बरीच कलाकार मंडळी याच बॉडी शेमिंगच्या मुद्द्यावर खुलेपणाने बोलत आहेत.
यातीलच एका अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या अतिशय अपमानास्पद आणि मनस्ताप देणाऱ्या प्रसंगाबद्दल खुलासा केला.
तारुण्यावस्थेत असताना आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगांबद्दल सांगणारी ही अभिनेत्री आहे सायंतनी घोष. आपल्या स्तनांच्या आकारावरून तरुण वयात असल्यापासूनच मला खूप काही ऐकावं लागल्याचं सायंतनी म्हणाली.
'जिथवर मला आठवतंय, मी तारुण्यावस्थेत असल्यापासूनच अशा प्रसंगांचा सामना करतेय. मला कळतच नव्हतं की नेमकं काय होत आहे. माझ्या मनात आजही या गोष्टींनी घर केलं आहे....', असं सायंतनी म्हणाली.
जागतिक मानसिक आरोग्य दिनी एक पोस्ट लिहिताना तिनं आपल्याला स्तनांचा आकार विचारल्याचा धक्कादायक खुलासा केला. जिथं तिला एका व्यक्तीनं स्तनांचा आकार विचारला.
हा प्रश्न ऐकूनच तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ज्यानंतर सायंतनीनं त्याला बोचऱ्या शब्दांत सुनावलं. जगात अशा अनेक गोष्टी आणि मुद्दे आहेत ज्यांच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. कारण कोणत्याही प्रकारची बॉडी शेमिंग ही वाईटच असते.
मला कळत नाही की पुरुषांना महिलांच्या स्तनांबाबत इतकं आकर्षण आणि वेड का आहे. काय आकार, काय माप, एक कप, बी, सी का डी? पुरुषच नाही, महिलाही याबाबत चर्चा करताना दिसतात. ठाऊर नाही, हा काय आजार आहे.... , अशा शब्दांत तिनं संताप व्यक्त केला.
आपलं हे म्हणणं पटवून देताना तिनं एक सुरेख संदेश यावेळी सर्वांना दिला. 'जगात सर्वजण एका शर्यतीत पळत आहेत. बरं इथं प्रत्येकजण संघर्ष करत आहे. खरंच आकार इतका महत्त्वाचा आहे का?
चला तर मग, एक मोठं मन सोबत बाळगू... ज्यामध्ये फक्त आणि फक्त प्रेम, आत्मसन्मान आणि दुसऱ्यांसाठी आदर असेल. दुसऱ्यांना स्वीकारणं आणि त्यांना मदत करणं हेच विचार मनात ठेवा....', असा संदेश तिनं दिला.