मुंबई : हर्षद मेहता (Harshad Mehta) याच्या जीवनावर आधारीत वेब सीरीज स्कॅम १९९२  (Scam 1992) रिलीज झाली आहे. ही सीरीज रिलीज झाल्यानंतर हर्षद मेहता या व्यक्तीची जोरदार चर्चा सध्या आहे. ही सीरीज पाहण्याआधी हर्षद मेहता म्हणजे शेअर बाजार भ्रष्टाचारातील आरोपी एवढंच मनात असतं. पण हर्षद मेहता वाढला कसा, शेअर बाजारात बिग बूल झाला कसा, भ्रष्टाचार कसा उघड झाला, ते थेट त्याच्या मृत्यूपर्यंतची उत्कंठा सर्वांना लागून असते, ती या सिरिजमध्ये मांडण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेक्षकांना स्कॅम १९९२ मध्ये हर्षद मेहता आणि त्याची पत्नी ज्योती मेहता यांची भूमिका कुणी पार पाडली, त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं आहे. हर्षद मेहता याची भूमिका पार पाडली, प्रतीक गांधी (Pratik Gandhi)याने, तर ज्योती मेहताची भूमिका पार पाडली, अंजली बरोट या अभिनेत्रीने.


स्क्रीनवर हर्षद मेहता याची भूमिका ज्याने पार पाडली तो प्रतीक गांधी हुबेहुब हर्षद मेहता सारखा दिसतोय. आता तुम्ही विचार करत असाल, प्रतीक गांधी आहे तरी कोण? प्रतीक गांधी हा गुजराथी थिएटर आणि सिनेमांमध्ये काम करणारा कलाकार आहे. 


तो 'दो यार', 'रॉन्ग साइड', 'मैं चंद्रकांत बख्शी', 'मोहन का मसाला' 'मेरे पिया गए रंगून' सारख्या नाटकांमध्ये भूमिका पार पाडत आला आहे 'स्कॅम 1992' च्या यशानंतर अर्थातच प्रतीक गांधीचा प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 'स्कॅम 1992' हिट झाल्यानंतर प्रतीक गांधी आणि अंजलीने आपल्या भूमिकेविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.


प्रतीक गांधी सांगतोय, या सीरीजमध्ये कसं काम मिळालं?


मी या सीरीजसाठी ऑडिशन दिलं होतं. या सीरीजसाठी डायरेक्टर हंसल मेहता यांनी माझे दोन ते तीन सिनेमे पाहिले होते. एवढंच नाही तर त्यांनी माझं नाटकातलं देखील काम पाहिलं होतं. जेव्हा हंसल यांना माहित झालं की, मी देखील या सीरीजसाठी ऑडिशन दिली आहे, तेव्हा त्यांनी हे ठरवलं की, ते मला या सीरीजमध्ये काम देतील. खरंतर त्यांनी माझं ऑडिशन देखील पाहिलं नव्हतं. यासाठी त्यांनी फक्त हेच पाहिलं की, या रोलसाठी मी किती तयार आहे.


ऑडिशनसाठी जे सीन केले होते, ते सीरीजमध्ये नव्हते, स्क्रिप्टवर काम करता करता या सीनलाच कात्री लागली. मी सात आठ लूक टेस्ट केले होते. सीरीज फायनल झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं वजन वाढलं आहे. मग दीड महिन्यानंतर माझा लूक टेस्ट करण्यात आला. पहिल्या मिटिंगला एक वर्ष झाल्यानंतर शुटिंगला सुरुवात झाली.


या सीरीजसाठी प्रतीकने किती किलो वजन वाढवलं?


या सीरीजसाठी मी १८ किलो वजन वाढवलं. माझं वजन आधी ७१ किलो होतं आणि सीरीज दरम्यान हे वजन ८९ किलोपर्यंत झालं होतं. माझ्यासाठी हर्षद मेहता स्क्रीनवर आणण्यापेक्षा एक मजेदार अनुभव होता. कारण हर्षद मेहता हे नाव जगात निगेटिव्ह आहे. लोकांच्या मनात या व्यक्तीबद्दल अनेक वेगवेगळ्या थेअरिज आहेत. या व्यक्तीबद्दल मी देखील खूप ऐकलंय, वाचलंय. मी ही भूमिका स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न केला.


वेब सीरीजमध्ये हर्षद मेहताची पत्नी ज्योती मेहता यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंजली बारोटने देखील अनेक महत्त्वाच्या आणि मजेदार गोष्टी सांगितल्या आहेत.  अंजली म्हणते मी या सीरीयलमध्ये काम केलं तेव्हा मला अंदाज नव्हता की, ही सीरीयल एवढी फेमस होईल.  


फक्त मला एवढंच माहित होतं की, मी हंसल सर यांच्या टीमशी जोडली जात आहे, तर ही चांगलीच फिल्म असेल. आता मी गर्वाने सांगू शकते की, या सीरीयलमध्ये मी देखील भूमिका पार पाडली आहे. जेव्हा मी स्वप्नातही विचार केला नव्हता की, मला एवढी प्रसिद्धी मिळेल.


दिग्दर्शक हंसल मेहता यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?


हंसल मेहता यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अतिशय महत्त्वाचा होता, ते एक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत, त्यांची स्क्रीप्ट ही ५०० पानांची होती, त्यातही एवढा स्पष्ट दृष्टीकोन ठेवणे सोपी गोष्ट नव्हती. हंसल मेहता यांच्यासोबत काम करण्यास खूप मज्जा आली.