Rajeshwari Deshpande in Sacred Games: दोन वर्षांपुर्वी आलेली सेक्रेट गेम्स (Scared Games) ही वेबसिरिज भारतातच नाही तर भारताबाहेर सगळीकडे पाहिली गेली. या वेबसिरिजनं सगळीकडेच पुरता धुमाकूळ घालून सोडला होता. या वेबसिरिजमधून बोल्ड सीन्स, मसाला, एक्शन, ड्रामा, अर्वाच्च शिव्या आणि खूनखरोबाचा पुरता मसाला भरलेला होता. हल्ली मालिका, चित्रपट किंवा वेब सीरिजमध्ये कथानकाच्या आवश्यकतेनुसार बोल्ड आणि इंटिमेट सीन (Bold and Initimate Scenes) कसून भरलेले पाहायला मिळतात अशा वेबसिरिजना पाहणारेही अनेक असतात. (scared games actress rajshri deshpande bold scene goes viral see what is she doing now)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुष्कळदा या वेबमालिकांच्या स्टोरीलाईनपेक्षा सर्वात जास्त चर्चा होते ती त्यातल्या बोल्ड सीन्सची. आताच मराठीतल्या रान बाजार (Raan Bazaar Marathi Web Series) या वेबमालिकेबाबतही असेच झाले. त्यांच्या प्रोमोंमुळे ही मालिका प्रचंड ट्रोल झाली. याला सेक्रेड गेम्स ही वेबसिरिजही अपवाद ठरली नाही. या मालिकेत सर्वात जास्त बोल्ज सिन्स नवाझुद्दीन सिद्दीकीचे (Actor Nawazuddin Siddiqui) होते. त्यातून त्यांच्यासोबत सैफ अली खानची (Saif Ali Khan) भुमिका प्रचंड गाजली होती. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री राजश्री देशपांडे (Rajshri Deshpande). राजश्रीनं या सीरिजमध्ये नवाझच्या पत्नीची म्हणजेच सुभद्राची (Subhadra) भूमिका साकारली होती.


या सीरिजच्या निमित्तानं तिनं काही बोल्ड सीनही दिले. हे सीन्स बरेच गाजले. या सीन्सवरून तिला प्रचंड ट्रोल केलं. परंतु त्याला न जुमानता आज राजश्री एक यशस्वी अभिनेत्री आहे आणि ती ओटीटीवर सध्या चांगलीच लोकप्रिय आहे. ती कामावरच लक्ष केंद्रीत करताना दिसली. आज ही सीरिज प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला. पण राजश्री मात्र तिच्या इंटिमेट सीनमुळं आजही चर्चेत असते.


सध्या ती विविध प्रोजेक्टवरही काम करताना दिसत आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. नुकतीच तिनं माधूरी दीक्षितच्या द फेम गेम (Madhuri Dixit's The Fame Game Web Series) या वेबसिरिजमधून भुमिका केली होती. ती तिच्या सामजिक कार्यातही व्यस्त असते. 



राजश्रीने दिलेले हे इंटिमेट सीन काहींना ते रुचले तर काहींनी तिची यावरून खिल्ली उडवली. पण आपण एक कलाकार असल्याचं म्हणत तिनं सर्वांनाच एका उत्तरानं गप्प केलं.