``अखेर माझं स्वप्न...!`` Anurag Kashyap च्या लेकीनं गुपचूप उरकला साखरपुडा, रोमॅण्टिक फोटो शेअर
Anurag Kashyap Daughter Aliyah Gets Engaged: प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपनं एक गुडन्यूज (Anurag Kashyap Daughter News) दिली आहे. तिच्या मुलीनं बाली येथे गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सध्या तिचे हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Anurag Kashyap Daughter Aliyah Gets Engaged: सुप्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक अनुराग कश्यपाच्या (Anurag Kashayp) लेकीनं नुकताच बाली येथे आपला साखरपुडा उरकला आहे. सध्या अनुराग कश्यपच्या मुलीचे आलियाचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या साखरपुड्याची सगळीकडेच चर्चा रंगलेली दिसते आहे. आलियानं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून आपल्या साखरपुड्याची गुडन्यूज आपल्या चाहत्यांना दिली आहे. यावेळी तिच्या या फोटोला तूफान लाईक्स (Aliyah Kashayp) आणि कमेंट्स आले आहेत. बालीसारख्या नयनरम्य ठिकाणी अनुराग कश्यपच्या लेकीनं आपला साखरपुडा पार पाडला आहे. यावेळी तिच्या वडिलांनी म्हणजेच अनुराग कश्यपनंही तिच्या या गुडन्यूजवर आपली प्रतिक्रिया उमटवली आहे. यावेळी तिला चाहत्यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
आलियानं चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केल्यानं तिच्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला आहे. यावेळी अनुराग कश्यपनंही आपल्या लेकीच्या या पोस्टवर तीन हार्ट इमोजीज कमेंटमध्ये टाकले आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की, यावेळी तिनं पांढऱ्या शुभ्र रंगाचा ड्रेस परिधान केला आहे ज्यावर हिरव्या रंगाचे फ्लावर्स आहेत. तिनं आपली रिंग एका फोटोत रिव्हिल केली आहे. तिचा आहे तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं पकडला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिनं आपल्या फियान्सेसोबतचा रॉमण्टिक फोटो शेअर केला आहे. एकमेकांसोबत लिपलॉक किसचा (Aliyah Kashyap Kiss) फोटो तिनं शेअर केला आहे.
हेही वाचा - ''असा कसा हा मुलगा?'' वडिलांच्या अंतयात्रेला गॉगल घातल्यानं Ayushmann Khurrana ला नेटकऱ्यांनी सुनावलं
यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''तर हे घडलंय... माझा खास मित्र, माझा पार्टनर, माझा जीवनसाथी आणि आता माझा होणारा नवरा! तु माझ्या आयुष्यचं प्रेम आहेस. मला निर्मळ आणि खरं प्रेम काय असतं हे सांगितल्याबद्दल तुझे खूप आभार. तुला 'हो' म्हणणं हे माझ्यासाठी त्यामुळेच सोप्पं झालं आहे आणि माझं उर्वरित संपुर्ण आयुष्य मला तुझ्यासोबतच घालवायचे आहे. माझं प्रेम. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझा यावर अजूनही विश्वास बसत नाहीये की हे घडलं आहे.''
या रोमॅण्टिक पोस्टसह तिनं एक प्रेमळ फोटोही शेअर केला आहे. यावेळी तिच्यावर चाहत्यांनी प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एवढंच नाही तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनाही तिच्या या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. सनी लिओनी, जान्हवी कपूर, शनाया कपूर, सयामी खेर, कुब्रा सईद अशा सेलिब्रेटींनीही तिला शुभेच्छा दिल्या आहे. आलियाही अनुरागच्या पहिल्या पत्नीची मुलगी (Anurag Kashyap Wife) आहे. त्यानंतर अनुराग आणि कलकी कोचलिन यांचे लग्न झाले होते परंतु त्यानंतर त्यांचाही घटस्फोट झाला.