Lust Stories Sex Toys :  नेटफ्लिक्सवर 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लस्ट स्टोरीज' या चित्रपटाची आजही चर्चा तर होतेच. या चित्रपटाला त्यावेळी चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. इतकंच नाही तर या चित्रपटातील काही सीन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. असाच एक सीन होता ज्यात अभिनेत्री कियारा अडवाणीची भूमिका व्हायब्रेटर वापरताना दाखवलं आहे. कियारानं या सीनमध्ये ऑर्गॅजम फील करत असल्याचे हावभाव दिले आहेत. त्यावरून सोशल मीडियावर कोणी तिच्या अभिनयाची स्तुती केली होती तर कोणी तिच्या या भूमिकेवरून तिला ट्रोल केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या इतक्या वर्षांनी चित्रपटाचे निर्माते सोमेन मिश्रानं सांगितलं की 'लस्ट स्टोरीज' च्या या सीननंतर सेक्स टॉयची विक्री वाढली. धर्मा प्रोडक्शनचे हेड ऑफ डेव्हलपमेंट सोमेन मिश्रा यांनी म्हटलं की ती शॉर्ट फिल्म काही योग्य कारणांसाठी व्हायरल झाली होती. पण सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे एक साइट आहे जी एडल्ट टॉइज विकती आणि त्यांनी त्यांच्या वार्षिक सर्वेमध्ये सांगितलं की दोन अशा संधी होत्या जेव्हा त्यांच्या विक्रीत वाढ झाली. सगळ्यात पहिली संधी ही कोव्हिडमध्ये आली होती आणि दुसरी जेव्हा 'लस्ट स्टोरीज' प्रदर्शित झाला होता. 


सोमेन मिश्रानं सांगितलं की "त्यांची विक्री 50 टक्के ते 55 टक्के वाढली होती. कारण लोकं ‘Kiara Advani vibrator’ आणि ‘Kiara Advani sex toys’ असं लिहून गूगरवर सर्च करत होते. मला वाटलं की ठीक आहे आम्ही लोकांच्या आयुष्यात काही मज्जा घेऊ जातोय, त्यातही महिलांच्या आयुष्यात. त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला अंदाज देखील नाही की 'लस्ट स्टोरीज' नं आमच्या व्यवसायावर काय बदल आणला आहे. तर मी विचार केला की याला तर मी माझ्या सीव्हीमध्ये लिहायला हवं. कारण मी कधी विचारही केला नव्हता की कोणातही चित्रपट लोकांच्या आयुष्यावर इतका प्रभाव करेल."


हेही वाचा : 'मला कधीच...', सलमान खानच्या बॅनर खाली चित्रपट न करण्यावर मेहुण्यानं सोडलं मौन


सोमेननं सांगितलं की फॅशन इंडस्ट्रीमध्ये चित्रपटांमुळे प्रभाव पडतो पण मी कधी विचार केला नव्हता की व्हायब्रेटर्सची बाबतीत देखील असं होईल. हा सीन करणारी अभिनेत्री कियारा अडवाणी विषयी बोलायचे झाले तर तिनं 'कॉफी विद करण' मध्ये सांगितलं की चर्चां दरम्यान, करण जोहरला सांगितलं की "माझ्या आईनं तुझ्या रोलसाठी नकार दिला होता कारण संपूर्ण स्क्रिप्टमध्ये तिचं लक्ष हे त्या सीनवर गेलं, जो सेंसश्नल सीन मला करायचा होता."