मुंबई : किरण रावने धोबी घाट सिनेमातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. नुकताच किरण रावचा 'लपता लेडीज' सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या सिनेमात किरण राव आणि ज्योती देशपांडेसोबतच आमिरही निर्माता म्हणून सहभागी झाला होता. हा सिनेमा सिनेमागृहात रिलीज झाल्यापासून खूप चर्चेत आहे. या सिनेमातील साधेपणाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र हा सिनेमा आता एका वेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अभिनेता आणि चित्रपट निर्माते अनंत महादेवन यांनी एक मोठा दावा केला आहे, जो ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसत आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच अभिनेता-चित्रपट निर्माते अनंत महादेवन यांनी एका मुलाखतीत धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज'मधील अनेक सीन्स १९९९ मधील 'घुंगट के पट खोल' या चित्रपटातील कॉपी आहेत. या सिनेमात विशाल वर्मा, नेहा पेंडसे, जॉय सेनगुप्ता, सुचेता खन्ना याचबरोबर इतरही बरेच कलाकार होते.


त्यांनी सांगितलं की, त्या चित्रपटात, एक शहरातील मुलगा त्याच्या गावी लग्नासाठी जातो आणि रेल्वे स्टेशनवर एक गोंधळ उडतो. जेव्हा त्याची पत्नी (नववधू) घुंगट घेवून असते, तेव्हा तो तिला काही वेळ वाट पाहण्यासाठी सांगतो एका बेंचवर. जेव्हा तो काही तपशील शोधत असतो मात्र तो परत आल्यावर, चुकीच्या वधूसोबत खाली उतरतो आणि सगळा गोंधळ उडतो.


अनंत पुढे म्हणाला, त्याच्या सिनेमाची कहाणी 'लापता लेडीज'द्वारा घेतलेल्या कथेपेक्षा नक्कीच वेगळी आहे. तसंच किरण राव दिग्दर्शित सिनेमात एक विशेष सीन होता ज्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला महिला घुंगटमध्ये असल्यामुळे ओळखता येत नव्हती. तो सीनही त्याच्या 'घुंगट के पट खोल' या चित्रपटातून काढून टाकण्यात आला होता, असंही तो म्हणाला.


अनंत महादेवनला हे देखील थोडं विचीत्र वाटलं की, त्यांचा सिनेमा 'घूंघट के पट खोल' जो काही वेळआधीपर्यंत युट्यूबवर उपलब्ध होता. आता रहस्यमयपणे सोशल मीडियावरुन गायब झाला आहे. अनंत महादेवन पुढे म्हणाला की, यावेळी त्यांनी यामुळे काहीच संपर्क साधला नाही. आमच्याकडे कोणताच पुरावा नाही कारण आमचा सिनेमा  यूट्यूबवर उपलब्ध नाही. जसं की किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा सिनेमा  OTT प्लॅटफॉर्म Netflix वर उपलब्ध आहे.''