मुंबई : संजय लीला भंसाळीच्या 'पद्मावत' चित्रपटाला समाजातील काही घटकांचा तीव्र विरोध असला तरीही रसिकांनी मात्र तुफान प्रतिसाद दिला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

25 जानेवारीला 'पद्मावत' हा सिनेमा प्रदर्शित झाला त्यानंतर असलेला लॉन्ग विकेंड आणि बहुप्रतिक्षित पद्मावत हे समीकरण जुळलं आहे. 


बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाला 50-55 टक्के ओपनिंग मिळाले आहे. 'पद्मावत' सिनेमा फेसबुकवर Leaked! १५ हजार युजर्सने केला शेअर


कमाई किती ? 


पद्मावत चित्रपटाने पहिल्याच दिवशी 18 कोटींची  कमाई केली होती.  दुसर्‍या दिवशी प्रजासत्ताकदिनाची सुट्टी असल्याने 'पद्मावत'ने लॉन्ग विकेंड एनकॅश करत  सुमारे 30 कोटींची कमाई केली आहे. 


ट्रेड अ‍ॅनालिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.  



 


संमिश्र प्रतिसाद  


करणीसेना, काही राजपूत संघटनांचा 'पद्मावत'ला असलेला विरोध पाहता अनेक सिनेमागृहांजवळ पोलिसांचा ताफा ठेवण्यात आला आहे.  
प्रेक्षकांनी संघटनांचा विरोध, धमक्या झुगारून सिनेमाला तुफान प्रतिसाद दिला आहे.  काही ठिकाणी 'हाऊसफुल्ल'चाही बोर्ड लागला होता. पण राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश येथील सिनेमागृहांमध्ये मात्र 'पद्मावत' झळकला नाही.  विकेंडला या चित्रपटाला अधिक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.  'या' राज्यात पद्मावत सिनेमाला असलेला राजपूतांचा विरोध मागे



कलाकारही आनंदात 


संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावत' हा सिनेमा 190 कोटी बजेटचा आहे.  हिंदीसोबतच हा चित्रपट तेलगू, तामिळ भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.  


रणवीर सिंह, शाहीद कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्या प्रमुख भूमिकेतील या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत. दीपिकाने हा सिनेमा बॉक्सऑफिसवर धमाकेदार कमाई करेल असा विश्वास वर्तवला आहे. पद्मावतच्या वादावर अखेर रणवीरने सोडलं मौन