मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटाच्या माध्यामातून कलाविश्वात पदार्पण केलं. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर जान्हवीने कधीचं मागे वळून पाहिलं नाही. जान्हवी तिच्या चित्रपटांसोबत खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. जान्हवी तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करते. जान्हवीने आता इन्स्टाग्रामवर एक तिने एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये जान्हवीच्या हातावर टॅटू दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे तिने तिच्या प्रेमाचा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवी काही सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ती सतत तिच्या सुट्ट्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'दिवस फार आनंदी गेला...' सध्या जान्हवीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे जान्हवीने हातावर 'लव्ह यू माय लब्बू' असं लिहिलं आहे. 



श्रीदेवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती 'रूही' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. चित्रपटातील तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केलं.