मुंबई : सध्या सगळीकडे प्रेमाचे वातावरण सुरु आहे. व्हॅलेंटाईन विकमधील वेगवेगळ्या डेजला सुरुवात झाली आहे.अनेकजण हे डेज सेलिब्रेट करत आहेत. आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमाची कबुली देण्याचे हे दिवस आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिवसात कपल्स आपलं प्रेम व्यक्त करतात.आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला गिफ्ट देतात. काही जण व्हॅलेटाईनच्या दिवसात आपल्या मनात असलेलं गुपित आपल्या आवडत्या व्यक्तीला सांगतात. 


मुकेश अंबानी यांना नीता अंबानी यांच्यासोबत पहिल्या नजरेत प्रेम झाले होते. दोघांच्या करिअरमध्ये आणि फॅमिली बॅकग्राऊंटमध्ये कोणतीच समानता नव्हती, तरीही त्यांच्यातील बॉन्ड खूप चांगले होते.


मुकेश अंबानींनी नीता यांनाच आपली जोडीदार बनवायचं हे ठरवलं आणि त्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये नीता अंबानी यांना प्रपोज केले होते.


मुकेश अंबानी नीता यांनी एका डेटवर घेऊन गेले आणि ट्रॅफिक सिग्नलवर गाडी थांबवून त्यांना प्रपोज केलं. प्रेमाची कबुली दिल्यानंतर जोपर्यंत नीता त्यांना उत्तर देत नाही, तोपर्यंत एकही कार पुढे जाऊ दिली नाही.



नीता यांनी अखेर होकार दिला आणि त्यांच्या नात्याची सुरूवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे सुखाने नांदत आहेत. प्रत्येक इव्हेटला आणि पार्ट्यांना मुकेश अंबानी पत्नी नीता अंबानी यांच्यासोबत जोडीने हजेरी लावतात.