शाहरूख खान म्हातारा झालाय....`हे` रियल फोटो पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
शाहरूख खानचे हे नो मेकअप लूक फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...शाहरूख खरंच म्हातारा झालाय
मुंबईः बॉलीवूड विश्वातील सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या तिन्ही खानांनी वयाची पन्नाशी पार केली आहे. मात्र आजही त्यांची जादू चाहत्यांवर कायम आहे. मात्र रील लाईफमध्ये पाहून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना त्यांचा विनामेकअप लूक फारसा रुचत नाही.
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आजही सर्व तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. स्वतःला तरुण दाखवण्यासाठी स्क्रीनवर कितीही मेकअप लावला तरी विनामेकअप लूक कधी ना कधी तर उघड होतोच आणि त्यावरूनच त्यांचं खरं वयंही उघड होतं
नुकतच शाहरूखही असाच विनामेकअप लूक दिसला आणि त्यामुळे त्याच्या चाहत्यांच्याही कपाळावर आठ्या आल्याचं दिसलं. काही परदेशी पाहुण्यांच्या भेटीदरम्यान शाहरूखचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोंमधला शाहरूखचा लूक पाहून कदाचित तुमचाही विश्वास बसणार नाही. पांढरे, विस्कटलेले केस, चेहऱ्यावर सुरकुत्या असा लूक पाहून चाहते त्याच्या वयावरून कमेंट्स करत आहेत.
बॉलीवूडच्या दुनियेत हे तिन्ही खान आपला लूक कायम राखण्यासाठी त्यांच्या मेकअपवर खूप खर्च करतात, सूत्रांच्या माहितीनुसार, ते त्यांच्या मेकअपवर पाण्यासारखा पैसा खर्च करतात. मात्र बऱ्याचदा त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या स्पष्ट दिसतात.
शाहरूख खानचं वय सध्या 56 वर्ष इतकं आहे, मात्र आजही शाहरूख अभिनेत्याच्याच रोलमध्ये दिसतो. त्याच्यापेक्षा वयाने कितीतरी लहान अभिनेत्रींसोबत तो सिनेमांमध्ये दिसतो. मात्र त्याच्या चाहत्यांना आवडो किंवा न आवडो, शाहरूख म्हातारपणाकडे झुकलाय हे मात्र निश्चित.