मुंबई : सलमान खानच्या चित्रपट बजरंगी भाईजानमुळे प्रसिद्ध झालेली मुन्नी म्हणजे हर्षाली मल्होत्रा या दिवसात एक नवीन टेलेंट शिकली आहे. चित्रपटानंतर तिनं अभ्यासावर भर दिला. त्यादरम्यान ती माध्यमांच्या चर्चेपासून दूर राहिली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन कविता लिहिली
हर्षालीने जी पोस्ट शेअर केली आहे ती खूपच मजेशीर आहे, तिने आपली पोस्ट शायरीत मांडली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये शेअर केलेल्या ओळीमध्ये हर्षालीने असं लिहिलं आहे की, आधी मी शाळेत जायचे, यायची मजा. आता नाही जावू शकत, मिळते सजा...पहिलं यायचं सगळ समजून, आता येत काहीच समजत नाही देवालाच माहिती कधी सुरु होईल शाळा.


या ओळींमध्ये तिने शाळा हरवल्याविषयी लिहिलं आहे. तिच्या या पोस्टला आतापर्यंत 40 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हर्षालीची ही गोष्ट, तिच्या आणि सलमान खानच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.



हर्षाली आठवीच्या वर्गात
हर्षाली सध्या घरी आहे. तिने इन्स्टाग्रामवर जी पोस्ट शेअर केली त्यानुसार ती आठवीत असल्याचं समजत आहे. शाळेत जाण्याची मजा तिचि हरवली आहे. ती शाळा लवकरात लवकर सुरू होण्याची वाट पाहत आहे. कोरोनामुळे, पुढील वर्गात मुलांना बढती दिली जात आहे. अभ्यासाची प्रणाली ऑनलाइन झाली आहे. यामुळे मुलांना शिक्षकांबद्दल जास्त माहिती नसते. हर्षालीनेही आपली व्यथा व्यक्त केली आहे. जुन्या शालेय शिक्षणाचे वातावरण कधी पूर्वी सारखी  होईल याची अशी चिंता पालकांसह सोबतच मुलेही करीत आहेत. यासाठी कोणाकडेही स्पष्ट उत्तर नाही.


5000 मुलांपैकी निवड झाली
सलमानच्या ब्लॉकबस्टर फिल्म बजरंगी भाईजानमधून हर्षाली मल्होत्राला प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात, तिने एका मुलीची भूमिका साकारली आहे जी पाकिस्तानमधील मुलगी भारतात हरवते. जी बोलू शकत नाही. सलमानच्या चित्रपटात दिसण्यापूर्वी ती टीव्हीमध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारायची. वयाच्या 7व्या वर्षी ती बजरंगी भाईजानसाठी निवडली गेली, त्यानंतर ती बाल कलाकार सुपरस्टार्सच्या श्रेणीत आली.


आता मुंबईत रहाते
तशी हर्षाली दिल्लीची आहे पण आता ती मुंबईत राहते. चित्रपटात दिसल्यानंतर तिचे पालक मुंबईत शिफ्ट झाले. शुटिंग दरम्यान सलमान हर्षालीच्या इतक्या प्रेमात पडला, की त्याने तिला आपली भाची बनवून टाकलं आणि ती आता सलमानला आपला मामा म्हणून संबोधते...