मुंबई : फिटनेस आयकॉन मलायका अरोरा तिच्या वर्कआऊटची विशेष काळजी घेते. यासोबतच अभिनेत्री तिच्या आहारावर देखील विशेष लक्ष केंद्रीत करते. वयाच्या 48 व्या वर्षीही मलायकाचे शरीर 20-25 वर्षांच्या मुलींइतकेच तंदुरुस्त आणि मजबूत आहे. यामध्ये तिच्या जिम, वर्कआउट आणि योगा यांचे महत्त्वाचे योगदान आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच एका मुलाखतीत मलायकाने तिच्या डाएट रुटीनबद्दल सविस्तर चर्चा केली. रोजच्या आहारापासून ते आवडते पदार्थ तिने सांगितले. या गप्पांमध्ये अभिनेत्रीने तिच्या आवडत्या व्यक्तीसोबत डेटवर गेल्यावर काय खायला आवडतं याचा ही खुलासा केला. यावेळी ती अगदी मोकळेपणाने बोलली. 


अभिनेत्रीने सांगितले की तिच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्यात बनवलेल्या लिंबू सरबतने होते.11 वाजता ड्रायफ्रुट्स आणि दुपारच्या जेवणात भाज्या, मसूर, चपाती आणि भात याचा समावेश असलेलं साधं घरगुती जेवण ती करते. आणि जेवणासोबत तिला लोणचं नेहमीच हवं असतं.


संध्याकाळी नाश्त्यात फळं आणि रात्रीच्या जेवणात मच्छी खाणं पसंत करत असल्याचं तिने सांगितलं.



आपल्या दैनंदिन आहाराबद्दल सांगताना मलायका म्हणाली की बॉयफ्रेंडसोबत असताना ही ती घरगुती साधं जेवणं करणं पसंत करते. रोमँटिक डिनर साठी गेल्यावर देखील साधं जेवणं करणंच मलायका पसंत करते.