नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑगस्टला डिस्कव्हरी चॅनल शो 'Man Vs Wild' च्या स्पेशल भागात बियर ग्रिल्ससोबत थरार करताना दिसले. या शो प्रसारित होण्याआधी बियर ग्रिल्सने रविवारी या शोचा छोटा हिस्सा इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. काही क्षणातच हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. इंस्टाग्रामवर सर्वांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतूक केले. पण या सर्वात पाकिस्तानी फॅनच्या एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सोबत बियर ग्रिल्सने हा थरार करावा अशी त्या कमेंट करणाऱ्या चाहत्याची इच्छा आहे. पंतप्रधान मोदी आणि बियर ग्रिल्स यांचा स्पेशल एपिसोड उत्तराखंडच्या जिम कॉब्रेट नॅशनल पार्कमध्ये शूट झाला आहे. मी खूप मोठ्या काळापासून भारताचा चाहता आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींसारख्या जागतिक नेत्याला जंगलात थरार अनुभवण्यासाठी नेणे हे माझे सौभाग्य असल्याचे त्याने म्हटले. मेन वर्सेस वाइल्ड हा जगातील सर्वात प्रसिद्ध शो पैकी एक असून जगभरातील सेलिब्रेटी यात सहभागी झाले आहेत. 



2015 मध्ये अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तो कार्यक्रम अमेरिकेच्या अलास्कामध्ये चित्रित करण्यात आला होता. बियर ग्रिल्सने ओबामा यांना मासे देखील खायला घातले होते. थोडे दचकतच त्यांनी हे मासे खाल्ले होते. तो कार्यक्रमही जगभरात पाहीला गेला आणि लोकप्रिय झाला.