मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा एक अप्रतिम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयाच्या बाबतीत प्रियंका चोप्राला तोडच नाही. ती तिच्या फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते. देसी लूक असो की वेस्टर्न लूक सोशल मीडियावर प्रियांकाचे फोटो व्हायरल होतात. तर अनेकदा तिला ट्रोलिंगला सामोर जावं लागत. स्टाईल आयकॉन मानली जाणारी प्रियंका आपल्या ड्रेसमुळे बर्‍याच इव्हेंटमध्ये ट्रोल झाली आहे. शिवाय प्रियंका तिच्या 'अपूर्ण' या पुस्तकाबद्दलही चर्चेत आहे.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच प्रियंका चोप्रा तिच्या एका ड्रेसमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. ट्विटरवर सर्व सगळ्या अभिनेत्री व्हायरल होत असतात, मात्र मजेची गोष्ट म्हणजे स्वत: प्रियांकाने व्हायरल होत असलेले मीम्स तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केले आहेत. प्रियंकाचा एक जो फोटो व्हायरल होत आहे त्यामध्ये तिने बॉल ग्रीन ड्रेस परिधान केला आहे. या कपड्याने तिने आपले केस बांधले आणि पायात काळे मोजे घातले आहेत.



अभिनेत्रीचा हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. प्रियंकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बर्‍याच मीम्स शेअर केल्या आहेत आणि नेटकऱ्यांचे आभार मानले आहेत. प्रियंकाने मीम्स शेअर करत, 'माझा दिवस साजराकेल्आबद्दल धन्यवाद'. असे कॅप्शन देत चाहत्यांचे आभार मानले आहेत...प्रियंकाने अलीकडेच आपल्या पुस्तकाचे लाँचिंग केले आहे. ज्यात तिने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.