मुंबई : बॉलीवूड ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ आणि एक्ट्रेस दिशा पटानी भले ही आपल्या रिलेशनशिप बद्दल कोणताही खुलासा करत नाहीत परंतु हे दोघेही कायमच एकत्र  स्पॉट होतात. त्या दोघांची केमिस्ट्री सोशल मीडियावर देखील स्पष्टपणे दिसत असते. आता देखील दिशाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दिशाचा हा ग्लॅमरस व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने टायगरला आणखी घायाळ केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बीटीएस व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर दिशा यामध्ये वेग-वेगळ्या पोज देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिशाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आतापर्यंत 7 लाख 55 हजारपेक्षा जास्त वेळा पाहिला आहे. सध्या सर्वत्र दिशाच्या नव्या व्हिडिओची चर्चा आहे. दिशाच्या फोटोवर टायगरची बहिण कृष्णा श्रॉफ कमेन्ट करत 'एब्सोल्यूट स्मोक शो.'  म्हणाली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दिशाच्या फोटो आणि व्हिडिओवर टायगर देखील प्रतिक्रिया देत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. रिलेशनशिप बद्दल सतत विचारणा केल्यानंतर टायगरने गेल्या वर्षी दिशाशी प्रेम संबंध नसल्याचं जाहीर केलं होतं. परंतु, त्याचे चाहते हे मान्य करण्यास तयार नाहीत जेव्हा-जेव्हा हे दोघे एकत्र पाहिले गेलेत तेव्हा-तेव्हा यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.