Year Ender 2019 : यंदाच्या वर्षी सोशल मीडियावर गाजले हे `Sensational Video`
प्रत्येक जण व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेत असतो.
मुंबई : आताच्या धावळीच्या जगात प्रत्येक जण व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेत असतो. सोशल मीडियाची ताकद अनन्यसाधारण आहे. एका साधारण व्यक्तीला रात्रीत स्टार बनवण्याची धमक या सोशल मीडियामध्ये आहे. आता इंटरनेटचं जाळं सर्वत्र पसरलेलं आहे. त्यामुळे जग फार जवळ आलं आहे. तर यंदाच्या वर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार नावारूपास आले. त्यामध्ये एक नाव म्हणजे रानू मंडल.
रानू मंडल
आयुष्यातील १० वर्ष कठीण प्रसंगांना तोंड दिल्यानंतर अखेर त्यांच्या जीवनात सोन्याचा दिवस आला आहे. हा दिवस त्यांच्या जीवनात गायक हिमेश रेशमियामुळे आला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांची गाणी गात आपलं पोट भरणाऱ्या रानू मंडल आज यशाच्या मार्गाकडे प्रवास करत आहे. त्यांच्या या प्रवासाला जोड आहे ती म्हणजे त्यांना मिळालेल्या दैवी देणगीची म्हणजे त्यांच्या आवाजाची.
त्याचप्रमाणे रानू यांचा आवाज आता फक्त बॉलिवूड पर्यंत मर्यादित राहिलेला नसून त्यांना दाक्षिणात्य चित्रपटांमधून सुद्धा ऑफर्स मिळत आहेत. रातोरात कोणीतरी यावं आणि सारं आयुष्यच बदलून जावं, असाच अनुभव त्या सध्या घेत आहेत.