मुंबई : तुम्ही जर  'मिर्जापुर 2' (Mirzapur 2) वेब सीरिज पाहिली असेल, तर तुम्हाला कालीन भैय्याची मोलकरीण चांगलीच लक्षात असेल. त्रिपाठी कुटुंबात अगदी साध्या कपड्यांमध्ये दिसणारी मोलकरीण म्हणजेच प्रशंसा शर्मा खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आणि तितकीच ग्लॅमरस आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर तिचे फोटो अक्षरश: धुमाकूळ घालत असतात असं म्हटलं तरीही हरकत नाही. 


 'मिर्जापुर 2' (Mirzapur 2) वेब सीरिजमध्ये प्रशंसानं राधाची भूमिका साकारली आहे. सीरिजमध्ये तिला फार मोठी भूमिका मिळाली नसली, तरीही तिनं मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे. 


प्रत्यक्ष जीवनात ती बरीच ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर सातत्यानं ती बोल्ड फोटो पोस्ट करत असते. मुख्य म्हणजे तिच्या या फोटोंना कमालीचे लाईक्सही मिळतात. 


प्रशंसाच्या मादतेबाबत सांगावं तर, ती 'आश्रम'फेम त्रिधा चौधरी हिलाही मागे टाकत आहे.



'ऑफिस-ऑफिस' या लोकप्रिय मालिकेचाही ती एक भाग होती. याशिवाय ती काही जाहिरातींमध्येही झळकली आहे. 



झारखंडमधील झुमरी तलैया येथे प्रशंसाचा जन्म झाला आहे. तर, देहरादून येथून तिनं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. पुढच्या शिक्षणासाठी तिनं दिल्लीही गाठली. 



दिल्लीत असतानाच तिनं थिएटर अर्थात अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करत सरावाला सुरुवात केली होती. बऱ्याच म्युझिक व्हिडीओंच्या माध्यमातूनही ती झळकली. 



मिर्झापूरनं प्रशंसाला खरी लोकप्रियता दिली. यामध्ये तिला इंटिमेट सीन प्रचंड गाजला होता.